

सध्या सलमान खानचे तारे काही योग्य दिशेत दिसत नाहीत. सलमानवर अलीकडेच एका दिग्दर्शकाने गुंडगिरी केल्याचा आरोप केला आहे. आता आधीच फटकळ म्हणून प्रसिद्ध असलेला अशनीर ग्रोवरही आता सलमान खान विरोधात विधान करताना दिसतो आहे. अशनीर सध्या राईज अँड फॉल हा शो होस्ट करतो आहे. आताही त्याने सलमानचे नाव न घेता त्यावर निशाणा साधला आहे. सलमान सध्या बिग बॉस 19चे होस्टिंग करतो आहे. (latest Entertainment News)
अशनीरच्या मते, कोणत्याही रिअलिटी शोमध्ये खरी मेहनत ही स्पर्धकांची असते. पण एका रिअलिटी शो मध्ये एक मोठा सुपरस्टार येतो आणि सगळे क्रेडिट घेऊन जातो.
एका मुलाखतीदरम्यान अशनीरने हा खुलासा केला आहे. सोशल मिडियावर अशनीरच्या होस्टिंग स्टाइलला खुपच ट्रोल केले जात आहे. याबाबत अशनीर बोलतो आहे की 'रिअलिटी शो हा पूर्णपणे स्पर्धकांचा असतो. आता हे सुदैव म्हणावे की दुर्दैव हे समजत नाही. पण आपल्या देशात एक मोठा शो आहे. जो एक मोठा सुपरस्टार होस्ट करत आहे. अर्थात हा शो त्या सुपरस्टारसाठीच ओळखला जातो. खरेतर हा त्याच्या स्पर्धकांसाठीच असायला हवा.
वीकएंडमध्ये येऊन शो हायजॅक केला जातो..
अशनीर पुढे म्हणतो, फॅक्ट अशी आहे की, स्पर्धक त्या शोला 24 तास देत असतात. पण तुम्ही तर वीकएंडला येता ना. खरे पाहता या शोच्या सगळ्या किल्ल्या स्पर्धकांच्या हातात असायला हव्यात. ना की अशा व्यक्तीच्या हातात जिथे एक व्यक्ति येते आणि सगळा शो हायजॅक करते.
सलमान आणि अशनीरचा वाद जुना आहे. अशनीरने एका मुलाखतीमध्ये सलमानवर राग व्यक्त केला होता. तो म्हणाला, ‘ मी सलमानला भेटलो आहे. तो स्पॉन्सर होता. शूटसाठी आम्ही भेटलो होतो. शूटचे ब्रीफ करण्यासाठी मी तीन तास बसून राहिलो होतो. त्याच्या मॅनेजरने सांगितले की भाईसोबत फोटो काढू नका. त्यांना आवडत नाही. मी त्याला म्हणालो मला नाही काढायचे फोटो. हा कोणत्या अॅटीट्यूड आहे.?’
अशनीरचे हे बोलणे सलमानच्या फॅन्सना अजिबात रुचले नव्हते. पण स्टोरीमध्ये खरं ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा अशनीर सलमानच्या बिग बॉस 18 मध्ये पाहुणा म्हणून गेला. त्यावेळी सलमानने या सगळ्यांचा खुलासा त्याचाकडे मागितला तेव्हा मात्र अशनीरने त्याची माफी मागितली होती.