

Bigg Boss 19 Trailer out now
मुंबई - बहुचर्चित शो बिग बॉसचा नवा सीजन खास ठरणार आहे. कारण, यंदा शो ची थीम नवी तर आहेच शिवाय, शोमध्ये स्पर्धक कोण असतील, याकडे लक्ष लागून राहिले आहे. अनेक स्टार्सची नावे देखील समोऱ आली आहेत. दरम्यान, शोचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. यामध्ये नेत्या सारख्या लूकमध्ये तो दिसत आहे. यावरून प्रेक्षक अंदाज लावताहेत की, सलमान नेतागिरी करताना दिसेल.
शोची टॅगलाईन देखील मजेशीर आहे. या शोची थीम 'घरवालों की सरकार!' अशी आहे. टीव्ही वरील या नव्या बिग बॉस शो साठी फॅन्स उत्सुक आहेत. हा रिॲलिटी शो मजेदार ठरणार आहे. यु-्यूबवर हा ट्रेलर पाहता येईल. पण स्पर्धक कोण कोण असतील याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
शोचा सेटअप देखील खास असणार आहे. ट्रेलरमध्ये दिसते की, सलमान खान गाडीतून उतरतो. यानंतर तो म्हणतो की - ‘ऐसा पहली बार हुआ १८-१९ सालों में. इस बार बिग बॉस में होगी घरवालों की सरकार’. सलमान खान म्हणतो की, यावेळी बिग बॉसच्या घरात लोकशाही पाहायला मिळेल. हा शो २४ ऑगस्टपासून ऑन एअर होणार आहे.
व्हिडिओमध्ये, सलमानने खुलासा केला की, घरातील सदस्यांना मोठे आणि छोटे निर्णय घेण्याचा अधिकार असेल, ज्यामुळे घर सार्वजनिकपणे रणांगणात बदलेल.
राम कपूर, अंशुला कपूर, गौरव तनेजा, अनीता हसनंदानी, मल्लिका शेरावत, जरीन खान यासारखे कलाकार बिग बॉसमध्ये सहभागी होणार नाहीत.