Pati Patni Aur Woh Do | ‘पती, पत्नी और वो दो’मधून आयुष्मानचा अफलातून लव्ह गेम, रोमान्सचा ओव्हरडोस!

Pati Patni Aur Woh Do Ayushmann Khurrana | आयुष्मान खुराणाचा' पती, पत्नी और वो दो' एक, दोन नव्हे तर तीन अभिनेत्रींसोबत रोमान्सचा तडका, नव्या चित्रपटाची चर्चा
image of Ayushmann Khurrana
Ayushmann Khurrana lead role in Pati Patni Aur Woh Do with three actresses Instagram
Published on
Updated on

मुंबई : बॉलीवूडमध्ये मुदस्सर अजीज सोबत एक चित्रपट येतोय, ज्यामध्ये आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत असेल. विशेष म्हणजे चित्रपटात एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. तीन अभिनेत्रींसोबत या चित्रपटात आयुष्मान रोमान्सचा तडका लावताना दिसणार आहे.

आयुष्मान खुरानाच्या फॅन्सना त्याच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा होती. मध्यंतरी एक वृत्त आले होते की, एका कॉमेडी चित्रपटासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक मुदस्सर अजीज सोबत त्याने हातमिळवणी केली होती. आता या नव्या चित्रपटाचे नाव पती, पत्नी और दो असे ठेवण्यात आले आहे.

image of Ayushmann Khurrana
रणबीर कपूरसाठी भन्साळींचं खास प्लॅनिंग; 'Love and War' बद्दल मोठा खुलासा?

या चित्रपटाची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार आहे. निर्माते शूटिंग सप्टेंबर, २०२५ मध्ये सुरु करणार असल्याची माहिती समोर आलीय. २०२६ च्या दुसऱ्या सहा महिन्यात हा चित्रपट रिलीज केला जाईल.

image of Ayushmann Khurrana
Hrithik Roshan and Jr NTR's Dance Battle | 'जनाब-ए-आली'ची झलक पाहाच; War 2 मध्ये ऋतिक-एनटीआरचा डान्स थरार घेऊन आला YRF

आयुष्मानचा आगामी चित्रपट

आयुष्मान खुरानाकेड हॉरर कॉमेडी 'थामा' चित्रपट देखील आहे. याआधी आयुष्मानचा 'बाला' बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. २५ कोटी बजेट चित्रपटाने जवळपास १७२ कोटी रुपयांचे वर्ल्डवाईड एकूण कलेक्शन केले होते.

'त्या' तीन अभिनेत्री कोण आहेत?
सूत्रांनुसार, 'पती पत्नी और वो' मध्ये सारा अली खान, वामिका गब्बी आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत असेल. भूषण कुमार आणि जूनो चोप्रा प्रोडक्शन अंतर्गत या कॉमेडी चित्रपटाचे डिटेल्स अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. सारा अली खान आणि वामिका गब्बी यांचे नाव आधीच कन्फर्म झालं होतं. नंतर रकुल प्रीत सिंहची एन्ट्री झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news