पुढारी ऑनलाईन डेस्क - सलमान खानचे वडील सलीम खान यांना पुन्हा नव्याने धमकी मिळाली आहे. सलीम खान रोजच्या प्रमाणे १८ सप्टेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते. तेव्हा गॅलेक्सी कडून एका दुचाकीस्वार जात होता आणि त्याच्या मागे एक बुर्काधारी महिला बसली होती. तिने सलीम खान यांच्याजवळ येऊन म्हणाली की, लॉरेंस बिश्नोई को भेजूं क्या?
रिपोर्टनुसार, स्कूटीचा नंबर ७४४४ होता. पोलिस त्या स्कूटीवाल्या व्यक्तीचा शोध घेत आहे.
सलमान अद्याप मुंबई शहरात नाही. काल रात्री त्याला मुंबई विमानतळावर कडक सुरक्षेदरम्यान पाहण्यात आलं होतं. असे म्हटले जात आहे की, सलमान आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंग साठी बाहेर जात असावा. सलमान खान शहरात नसताना 'लॉरेंस बिश्ननोई'च्या नावाने त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देणं, चिंतेत टाकणारं आङे. ही धमकी पहिल्यांदाच देण्यात आलेली नाही तर याआधीही गँगस्टरकडून सलमान खानच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली आहे.