पुढारी ऑनलाईन डेस्क - गायक हिमेश रेशमियाचे वडील आणि प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर विपिन रेशमिया यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. १८ सप्टेंबरच्या संध्याकाळी साडे आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिमेश रेशमिया आपल्या वडिलांना गुरू मानायचा.
रिपोर्ट्सनुसार, हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया यांना वाढत्या वयामुळे अनेक समस्या, आजारांचा सामना करावा लागत होता. त्यांना श्वास घेण्यास कठीण जात होते. तेव्हा त्यांना तत्काळ रुग्णालयाता दाखल केले होते.
फॅशन डिझायनर वनिता थापर यांनी माहिती दिली आहे की, विपिन रेशमिया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार १९ सप्टेंबरला जुहूमध्ये केले जाईल. गुरुवारी, त्यांचे पार्थिव घरी आणण्यात येणार आहे. विपिन रेशमिया यांच्यावर अंत्यसंस्काराची माहिती देत वनिता थापरने सांगितलं की, 'खूप अधिक दु:ख होत आहे. मला आतापर्यंत या गोष्टीवर विश्वास होत नाहीये की, ते आता या जगात नाहीत. आमचे नाते २० वर्षे जुने होते. ते कमालीचे व्यक्ती होते. त्यांचे सेंस ऑफ ह्युमर गजब होते. ते संगीतातील अनेक बारीक गोष्टी लक्षात ठेवत असत. जेव्हा देखील हिमेशचा फोन यायचा तेव्हा ते नेहमी त्याला सांगायचे की, असे कर, तसं करायला पाहिजे.'