

Sajid Nadiadwala Akshay Kumar Housefull 5 Teaser
मुंबई : अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘हाऊसफुल ५’ चा टीजर रिलीज झाला आहे. कॉमेडी मर्डर मिस्ट्री असणाऱ्या या चित्रपटात अक्षय कुमारच्या जोडीला यो यो हनी सिंह दिसणार आहे. यो यो हनी सिंहच्या म्युझिकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये बॅकग्राऊंडला हनी सिंहचे लाल परी गाणे ऐकू येतं.
साजिद नाडियाडवालाच्या या चित्रपटाचे टीजर नाडियाडवाला ग्रँडसनच्या ऑफिशियल यू-ट्यूबवर लॉन्च केलं आहे. फॅन्स आता हनी सिंहच्या गाण्याचे कौतुक करत कॉमेंट केले आहेत. यो यो हनी सिंह आणि अक्षय कुमारचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठेरल, असेही काहींनी म्हटले आहे.
तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार सोबत श्रेयस तळपदे, संजय दत्त, निकेतन धीर, फरदीन खान, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडीस, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंह, नरगिस फाखरी, रंजीत, सौंदर्या, जॉनी लीवर आणि चंकी पांडे यांच्या भूमिका असणार आहे. साजिद नाडियाडवाला बॅनर अंतर्गत चित्रपट ६ जूनला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
एका युजरने लिहिलं, ‘यो यो हनी सिंहला घेतल्याविना चित्रपट चालत नाहीत.’ दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘यो यो हनी सिंह ब्लॉकबस्टर लोडिंग.’ तिसऱ्या युजरने लिहिलं, ‘हनी पाजी का गाना, ये हुई ना बात’. आणखी एखा युजरने लिहिलं-‘अक्षय कुमार आणि हनी सिंह एकत्र, आता थिएटर होणार हाऊसफुल्ल.’