

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साजिद खान यांचा सेटवर अपघात झाल्याची बातमी समोर आली असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर सेटवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती फराह खानने दिली असून चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
Sajid Khan Accident updates news
बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक साजिद खान यांचा चित्रपटाच्या शूटिंग सेटवर अपघात झाला आहे. ही घटना शूटिंग सुरू असतानाच घडली असून, अपघातानंतर साजिद खान यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेनंतर सेटवर काही काळ तणावाचं वातावरण होतं. अपघाताच्या वेळी साजिद एकता कपूरच्या निर्मितीसाठी शूटिंग करत होता.
चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांचा सेटवर अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. अपघातानंतर साजिद यांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची बहीण फराह खान यांनी अपघाताची पुष्टी केली.
साजिद खानचा एका त्रपटाच्या सेटवर अपघात झाला. या अपघातात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. अपघातानंतर साजिदला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याची बहीण फराह खानने अपघाताची माहिती दिलीय. तिने सांगितले आहे की, त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्यांची तब्येत ठीक आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, साजिद खानची बहीण फराह खानने अपघाताची पुष्टी केली आहे. रविवारी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तो आता बरा होत आहे," असे तिने सांगितले.
मागील महिन्यात त्याने त्याचा ५५ वा वा वाढदिवस साजरा केला होता. त्याने बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला होता. आता तो दिग्दर्शक म्हणून परतणार आहे. साजिदने २००५ मध्ये "डरना जरूरी है" या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. पुढे "हाऊसफुल" फ्रेंचायझीमधील चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हमशकल्स, हे बेबी असे चित्रपट दिले.