

हित सूरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने बॉलीवूडला एक फ्रेश जोडीही दिली. अहान पांडे आणि अनीत पड्डाची ही जोडी आता रियल लाईफमध्येही एकत्र दिसते आहे. याला निमित्त आहे ते अनीतच्या वाढदिवसाचे. अहानने सोशल मीडियावर काही अनसीन फोटो शेअर केले होते.
एका कॉन्सर्टदरम्यानच्या या फोटोत दोघेही धमाल करताना दिसतात. एका रिपोर्टनुसार हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. ‘सैय्यारा’च्या सेटवर दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. अर्थात दोघांनी या नात्याबाबत एक शब्दही शेअर केलेला नाही.
दोघेही आपले नाते प्रायव्हेट ठेवण्याला प्राधान्य देत आहेत. अनीतने अभिनेत्री कियारा आडवाणीला रीप्लेस करत ‘शक्तिशालिनी’ चित्रपटासाठी दावेदारी सिद्ध केली आहे. याशिवाय ‘कोर्टरूम ड्रामा’ मध्येही ती दिसणार आहे, तर अहान हा अली अब्बास जफरच्या सिनेमात शर्वरी वाघ हिच्यासोबत झळकणार आहे.