Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात! कारच्या उडाल्या चिंधड्या; व्हिडीओ आला समोर

रेसच्या दुसऱ्या राऊंड दरम्यान त्याची कार ट्रॅकवर अपघातग्रस्त झाली
Entertainment
Actor Ajith Car AccidentPudhari
Published on
Updated on

famous actor car accidentतमिळ अभिनेता अजिथकुमारच्या चाहत्यांना काळजीत पाडणारी बातमी समोर येत आहे. अभिनेत्याचा कार अपघात झाला आहे. इटलीमध्ये अलीकडेच पार पडलेली GT4 युरोपियन सिरिजदरम्यान अजिथकुमारचा अपघात झाल्याचे समोर येत आहे. रेसच्या दुसऱ्या राऊंड दरम्यान त्याची कार ट्रॅकवर अपघातग्रस्त झाली. सुदैवाने अजिथ यांना कोणतीही इज झाली नसल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्या झाल्या अजिथ यांना रेसमधून बाहेर पडावे लागले. पण यावेळी एका कृतीने चाहत्यांचे लक्ष्य त्यांनी वेधून घेतले आहे.

अपघातानंतर अजिथ स्वत: ट्रॅकवर ग्राऊंड स्टाफसोबत स्वच्छता करताना दिसून आले.सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडियोमध्ये कॉमेंटरी करणाऱ्या व्यक्तीने अजिथकुमार यांच्या रेसिंग कारचा अपघात झाल्यावर ते रेसमधून बाहेर पडल्याची घोषणा केली. त्यानंतर पुढे ते म्हणतात, ‘ या वर्षी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत अशी घटना घडताना पाहत आहोत. ते एक चांगले रेसर आहेत. जे अनेकदा मार्शलसोबत ट्रॅकवरचा कचरा काढायला मदत करतात. बाकीचे बरेच ड्रायव्हर असे करताना दिसत नाहीत.'

Entertainment
Marathi Serial Actress: थोडं तुझं, थोडं माझं मालिकेतील अभिनेत्रीला झाला होता हा आजार; सेटवर पुन्हा जंगी स्वागत

नक्की काय घडले ट्रॅकवर

अजिथ कुमार यांची कार ट्रॅकवर असलेल्या दुसऱ्या कारला जाऊन धडकली. या नंतर त्यांनी ग्राऊंड स्टाफला केलेल्या मदतीचे नेटीझन्स कौतुक करताना दिसत आहेत. एकजण त्यांना चांगला माणूस म्हणतो आहे तर दूसरा थाला म्हणतो आहे.

तिसऱ्या सीझनची तयारी

अजित बेल्जियममध्ये तिसऱ्या सीझनची तयारी करत आहेत. अजिथचे नाव रेसिंग क्षेत्राशी 2003 पासून जोडले आहे. त्यांनी 2010 मध्ये फॉर्म्युला 2 चॅम्पियनशिप स्पर्धेत हिस्सा घेतला होता. सिनेमा आणि रेसिंग मधील योगदानासाठी त्यांना पद्मभूषणही मिळाला आहे.

वडिलांनी दिली प्रेरणा

अजिथ यांनी बरेचदा अभिनयात जास्त रस नसून रेसिंगमध्ये रस असल्याचे अनेकदा सांगितले आहे. 2000 मध्ये जेव्हा अभिनय सोडून रेसिंग हेच पूर्णवेळ करियर करण्याचा निर्णय अजिथ यांनी घेतला तेव्हा त्यांना वडिलांनी सपोर्ट केल्याचेही सांगितले होते. तर याउलट मित्रमंडळी आणि घरचे सदस्य त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात होते.

Entertainment
Tara Sutaria : तारा सुतारियाला डेट करतोय माजी मुख्यमंत्र्यांचा नातू; इतक्या संपत्तीचा आहे मालक, मावशीही आहे राजकारणात

अजिथ कुमारचा आगामी सिनेमा

त्यांचा गुड, बॅड, अग्ली हा सिनेमा 2025 मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा तमिळ सिनेमा बनला आहे. सध्या अजिथ यांनी सिनेमातून ब्रेक घेतला असून लवकरच ते आगामी सिनेमाची घोषणा करतील असे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news