

Saiyaara movie collection latest news
मुंबई - वायआरएफ आणि मोहित सूरी यांचा 'सैयारा' फक्त १२ दिवसांत २०२५ मधील परदेशातील सर्वात यशस्वी हिंदी चित्रपट ठरला आहे. सैयाराने बॉक्स ऑफिसवर ११ दिवसात जगभरात ४०० कोटींची कमावले होते. त्यामुळे या वर्षाची ही दुसरी हाएएस्ट ग्रॉसिंग हिंदी चित्रपट ठरलाय. भारतीय चित्रपटसृष्टीतील आजवरचा सर्वात यशस्वी प्रेमकथा म्हणून ‘सैयारा’ने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. अवघ्या १२ दिवसांत या चित्रपटाने परदेशी बाजारात सुमारे ९० कोटी रुपये कमावले आहेत.
रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच २५ ते २७ जुलै दरम्यान, ‘सैयारा’ ने परदेशी बाजारात जवळपास ४ मिलियन डॉलर कमावले, जे पहिल्या आठवड्याच्या सुमारे २ मिलियन डॉलरच्या कमाईच्या तुलनेत शंभर टक्के वाढ आहे.
शुक्रवार – १८.५० कोटी
शनिवार – २७ कोटी
रविवार – ३० कोटी
सोमवार – ९.५० कोटी
मंगळवार – १०.५० कोटी
एकूण दुसरा आठवडा – ९५.५० कोटी
एकूण भारतातील कमाई – २७०.७५ कोटी नेट
भारतात सैयाराची क्रेझ प्रचंड आहे. एकट्या मंगळवारी या चित्रपटाने इंडियामध्ये १० कोटीपर्यंत बिझनेस केला आहे. भारतामध्ये, ‘सैयारा’ची यशस्वी घौडदौड सुरू झालीय. फक्त १२ दिवसांत २७०.७५ कोटी नेट कमावले आहेत. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाचा जोर कायम आहे.