Saiyaara re-release: अहान पांडे-अनित पड्डा पुन्हा भेटीला; लव्हबर्ड्ससाठी सैयारा यादिवशी होणार रि-रिलीज

Saiyaara re-release: अहान पांडे-अनित पड्डा पुन्हा भेटीला; लव्हबर्ड्ससाठी सैयारा यादिवशी होणार रि-रिलीज
Saiyaara poster
Saiyaara re-releaseinstagram
Published on
Updated on
Summary

अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे चर्चेत असलेला ‘सैयारा’ चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रि-रिलीज होणार आहे. लव्हबर्ड्ससाठी खास निवडलेल्या दिवशी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार असून, प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

Saiyaara re-release in theater

अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा चित्रपट सैयारा पुन्हा रिलीज होणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आधी थिएटरमध्ये त्यांच्या फॅन्सना हा चित्रपट पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा गेल्या वर्षीचा सर्वात मोठा हिट चित्रपटांपैकी एक होता.

मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या आधी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर 'सैयारा'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या म्युझिकल रोमान्स चित्रपटात नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपटांची क्रेझ कायम असते आणि त्यातच काही चित्रपट असे असतात, जे प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून बसतात. अहान पांडे आणि अनित पड्डा यांची मुख्य भूमिका असलेला ‘सैयारा’ असाच एक चित्रपट ठरला होता. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा ही प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे ‘सैयारा’ चित्रपटाचा रि-रिलीज जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा रि-रिलीज लव्हबर्ड्ससाठी खास ठराविक दिवशी केला जाणार असल्याने रोमँटिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. थिएटरमध्ये पुन्हा एकदा अहान आणि अनितची केमिस्ट्री अनुभवण्यासाठी व्हॅलेंटाईन डे चा आधीचा दिवस निवडण्यात आला आहे.

Saiyaara poster
Krish 4 | 'वाराणसी'नंतर प्रियांकाचे बॉलिवूड कमबॅक! 'क्रिश-४'मध्ये 'देसी गर्ल'ची एन्ट्री

मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा गेल्या वर्षीचा सर्वात मोठा हिट चित्रपटांपैकी एक होता. या म्युझिकल रोमान्स ड्रामामध्ये अहान पांडे आणि अनित पड्डा यांची फ्रेश जोडी होती. त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Saiyaara poster
Bigg Boss Marathi-6 | कुल बॉईज रोशन-ओमकारमध्ये जुंपलं, घरात नवा ड्रामा?

वायआरएफ, 'सैयारा'च्या निर्मात्यांनी रि-रिलीज बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी व्हॅलेंटाईन वीकमध्ये मुंबई, दिल्ली, बंगळूर आणि पुणे येथील थिएटरमध्ये 'सैयारा' पाहता येणार आहे.

या चित्रपटाने जगभरात ५७७ कोटींचा गल्ला जमवला होता. तो केवळ २०२५ सालचा हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. यातील दोन्हीही कलाकारांना रातोरात स्टार बनवले. 'सैयारा'मधून अहान बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट होता. तर काजोलच्या 'सलाम वेंकी'मध्ये काम केलेल्या अनितने या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेत्री म्हणून डेब्यू केला होता. ती जाहिरातीतही झळकली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news