Krish 4 | 'वाराणसी'नंतर प्रियांकाचे बॉलिवूड कमबॅक! 'क्रिश-४'मध्ये 'देसी गर्ल'ची एन्ट्री

Krish 4 |आलिया-श्रद्धावर भारी पडली प्रियांका! 'देसी गर्ल'चे 'क्रिश-४' मधून कमबॅक
priyanaka chopra hritik roshan
priyanka chopra in Krish 4 instagram
Published on
Updated on
Summary

हॉलीवूडमध्ये दमदार कारकीर्द घडवल्यानंतर प्रियांका चोप्रा पुन्हा बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रोजेक्टसह कमबॅक करत आहे. ‘वाराणसी’नंतर आता ती थेट ‘क्रिश-4’मध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. ऋतिक रोशनसोबत तिची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, या सुपरहिरो चित्रपटात तिची भूमिका कथेला नवे आयाम देणारी ठरणार आहे.

krih 4 priyanaka chopra lead actress

बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. प्रियांकाचा आगामी चित्रपट 'वाराणसी' पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. या चित्रपटात प्रियांका महेश बाबूसोबत दिसणार आहे. दरम्यान, प्रियांका हृतिक रोशनच्या चित्रपटात धुमाकूळ घालणार असल्याची बातमी समोर आली आहे.

प्रियांका चोप्रा बऱ्याच काळानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत परतत आहे. ती एसएस राजामौली यांच्या मेगा-बजेट चित्रपट 'वाराणसी'मध्ये सामील झाली आहे. वृत्तानुसार, हा चित्रपट १३०० कोटी बिग बजेटसह बनवला जात आहे, ज्यामुळे तो भारतातील दुसरा सर्वात महागडा चित्रपट असेल. प्रियांका त्यात खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. शूटिंग आधीच सुरू झाले आहे.

दरम्यान, प्रियांकाच्या फॅन्ससाठी चांगली बातमी आहे. वाराणसीनंतर, प्रियांकाला आता कृष ४ मध्ये देखील कास्ट करण्यात आले आहे.

priyanaka chopra hritik roshan
New Marathi Film |सोलो ट्रिपचा सुंदर प्रवास आणताहेत प्रार्थना, पूजा, अभिजीत; 'सखे गं साजणी'ची घोषणा

क्रिश ४ हा देखील एक प्रमुख चित्रपट आहे. हा बॉलीवूडच्या सर्वात लोकप्रिय सुपरहिरो फ्रँचायझी 'क्रिश' चा चौथा भाग आहे. फॅन्सची प्रतीक्षा आता संपली आहे. बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन क्रिशची मुख्य भूमिका साकारणार आहे. हृतिक हा चित्रपट दिग्दर्शितही करणार आहे.

आलिया भट्टी - श्रद्धा कपूरला टाकले मागे

क्रिश ४ साठी अनेक अभिनेत्री लाईनमध्ये होत्या. त्यापैकी एक होती श्रद्धा कपूर आणि दुसरे नाव चर्चेत होते-ते म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा कृष ४ मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात होते. तर दुसराकीडे, आलिया भट्ट लीड भूमिका साकारेल असे म्हटले जात होते.

priyanaka chopra hritik roshan
Bigg Boss Marathi-6 | कुल बॉईज रोशन-ओमकारमध्ये जुंपलं, घरात नवा ड्रामा?

'क्रिश’ ही फ्रँचायझी ऋतिक रोशनसाठी अत्यंत खास मानली जाते. ‘कोई… मिल गया’, ‘क्रिश’, ‘क्रिश-3’ या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता ‘क्रिश-4’कडून अपेक्षा अधिक वाढल्या असून, त्यातच प्रियांका चोप्राचा समावेश झाल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी ‘क्रिश’ आणि ‘क्रिश-3’मध्ये प्रियांका ऋतिकसोबत झळकली होती आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news