Sadhguru on Ranbir Kapoor: आज राम तर उद्या रावण.....रणबीरच्या रामाच्या व्यक्तिरेखेवर हे काय बोलून गेले सद्गुरू? वाचा सविस्तर

पण या भूमिकेत रणबीर दिसण्याबाबत अनेकांनी ट्रोल केले
Entertainment
रणबीरच्या सुरू असलेल्या ट्रोलिंगबाबाबत सद्गुरूनी प्रतिक्रिया दिलीPudhari
Published on
Updated on

अभिनेता रणबीर कपूर नितेश तिवारीचे दिग्दर्शन असलेल्या रामायण या सिनेमामुळे चर्चेत आहे. रणबीर या सिनेमात रामाच्या भूमिकेत दिसतो आहे हे सर्वश्रुत आहे. पण या भूमिकेत रणबीर दिसण्याबाबत अनेकांनी ट्रोल केले. रणबीरची पडद्याबाहेरची भूमिका आणि आता तो साकारणार असलेली रामाची भूमिका यावरून अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती. (Latest Entertainmment News)

पण सद्गुरू यांनी मात्र रणबीरची पाठराखण केली आहे. रणबीरच्या सुरू असलेल्या ट्रोलिंगबाबाबत सद्गुरूनी प्रतिक्रिया दिली आहे.

Entertainment
Mamta Kulkarni: दाऊद इब्राहीमने मुंबईमध्ये ब्लास्ट केलाच नव्हता, तो आतंकवादी नाहीये; ममता कुलकर्णी बरळली

सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी एका मुलाखतीदरम्यान सद्गुरू यांना विचारले रणबीर कपूर रामायण मध्ये श्रीराम कशाप्रकारे साकारतील? याचे उत्तर देताना सद्गुरू म्हणतात, ‘ एका अभिनेत्याबाबत हे अत्यंत चुकीचे मत आहे. कारण त्याने यापूर्वी वेगळ्या व्यक्तिरेखात अभिनय केला आहे म्हणून? तुम्ही त्याला राम होण्याची अपेक्षा करू शकत नाही? उद्या तो दुसऱ्या सिनेमात रावणाची भूमिकाही साकारू शकतो.’

केवळ राम साकारत असलेल्या रणबीरचीच नाही तर रावण साकारत असलेल्या यशचे कौतुकही केले आहे. ते म्हणतात, ‘ यश एक हँडसम माणूस आहे.’ यावर नमित म्हणतो, ‘ यश हॅंड्सम आहेच याशिवाय देशातील एक टॅलेंटेड सुपरस्टारही आहे. लोकांना तो आवडतो. आम्ही रावणाचे सगळे रंग दाखवण्यास इच्छुक आहे. यात त्या व्यक्तिरेखेच्या सगळ्या शेडस दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे.

Entertainment
Jaya Bachchan Agastya Nanda: मी कुणाचे सहसा कौतुक करत नाही पण....नातू अगस्त्य नंदाच्या 'इक्कीस'चा ट्रेलरनंतर जया बच्चन यांची पोस्ट चर्चेत

रणबीर बनला शाकाहारी?

या सिनेमातील रामाच्या व्यक्तिरेखेसोबत आध्यात्मिक पद्धतीने जोडले जाण्यासाठी रणबीरने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. या सिनेमात अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news