Saapala Movie : चिन्मय मांडलेकरचा ‘सापळा’ चित्रपट यादिवशी भेटीला

Saapala movie
Saapala movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'सापळा' हा आगामी मराठी चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी त्याचे पोस्टर प्रदर्शित झाले. (Saapala Movie) या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी यांच्या भूमिका आहेत. निखिल लांजेकर दिग्दर्शित 'सापळा'ची कथा श्रीनिवास भणगे यांची आहे. पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढारकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे. (Saapala Movie)

संबंधित बातम्या – 

चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, "मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. अशाप्रकारच्या कथा या प्रेक्षकांना नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्री श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही."

"श्री दिगपाल लांजेकर यांच्या समर्थ लेखणीच्या आधारे या कलाकृतीची पुनर्निर्मिती आम्ही करत आहोत. याची पटकथा आणि संवाद आजच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले गेलेले आहेत. कथेमध्ये अत्यंत बारकाईने सुधारणा करून त्यात आधुनिकता आणली गेली आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आश्चर्यानी भरलेला हा कथेचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून तर ठेवेलच पण त्याचबरोबर त्यांना अचंबितसुद्धा करेल. समकालीन आणि कालातीत अशा दोन्हीचा एक आगळा असा मिलाफ यात साधला गेला असून त्यातून एक असा सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना मिळेल की जो आपल्या समृद्ध अशा कथाकथन परंपरेचा एक नमूना असेल."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news