Rutuja Bagwe: 'स्टेजवर एंट्री घेण्याआधी पाण्याच्या दोन बाटल्या'.....अभिनेत्री ऋतुजा बागवेने मित्र सिद्धार्थसाठी केली भावनिक पोस्ट

सिद्धार्थने छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली
Entertainment
ऋतुजा बागवेने मित्र सिद्धार्थसाठी केली भावनिक पोस्टpudhari
Published on
Updated on

अभिनेता सिद्धार्थ बोडकेची मुख्य भूमिका असलेला "पुन्हा शिवाजीराजे भोसले"
याजसाठी केला होता अट्टहास हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात सिद्धार्थने छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. या व्यक्तिरेखेसाठी सिद्धार्थची मैत्रीण अभिनेत्री ऋतुजा बागवेने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. (Latest Entertainment News)

यावेळी केलेल्या सोशल पोस्टमध्ये ऋतुजा म्हणते,प्रिय सिद्धार्थ
आज तुला मोठ्या पद्द्यावर खूप महान व्यक्तिमत्व साकारताना पाहिलं, जादू करताना पाहिलं.
आणि अभिमानाने उर भरून आला डोळे पाणावले..

यावेळी तिने अनन्या नाटकातील सिद्धार्थच्या भूमिकेविषयी लिहिले आहे. ती म्हणते, ‘हाच तो आमचा सिद्धुड़ी “अनन्या” नाटकात स्टेजवर एंट्री घेण्याआधी एंक्सियस असायचा पाण्याच्या दोन बाटल्या संपवायचा आणि स्टेजवर पाऊल ठेवताच पहिल्या चार वाक्यात प्रेक्षाकांची मनं जिंकायचा जादू करायचा, प्रवेश संपेपर्यंत प्रेक्षकांना आपल्या भूमिकेच्या कामाच्या प्रेमात पाडायचा. co-actor म्हणून कायम वाटायचं प्रेक्षक म्हणून ह्याचं काम पहायला काय मज्जा येत असेलं. त्याच्या अभिनयातली सहजता मी कधी आत्मसात केली मला कळलचं नाही. पुढ़े त्याची अनेक कामं प्रेक्षक म्हणून एंजॉय केली “sad सखाराम” नाटका मधलं तुझं काम पाहून ,तू माझ्या आवड़त्या कलाकरांच्या यादित क़ायम स्वरूपी जागा केलीस ज्यांच काम मला इन्स्पायर करत.

Entertainment
Shahrukh Khan: तुझा तर चेहरा पण चांगला नाही स्टार कसा बनला? विचारणाऱ्या फॅनला शाहरुखचे तिखट उत्तर चर्चेत

आणि मी मनापासुन कायम प्रार्थना केली की तुला तुझ्या पोटेंशियलचं कडक प्रोजेक्ट मिळो. आणि आजचा तो दिवस मी जवळून पाहिला आणि त्या संधीचं तू सोनं केलस. ही भूमिका खूप जबाबदारीची आणि कठिण होती आणि तू ती लीलया पेलली आहेस तू खूप सहज सुंदर आणि खूप खंर काम केलयस. महाराजांचे डोळे कसे असतील असा कायम मनात विचार यायचा आज ते डोळे सापड़ले आणि कलाकार,अभिनेता म्हणून तू जिंकलास
वर्षभारतील सगळे पुरस्कार ,प्रेक्षाकांच प्रेम, आणि उत्तमोत्तम भूमिका तुझ्या वाट्याला येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

Entertainment
Mamta Kulkarni: दाऊद इब्राहीमने मुंबईमध्ये ब्लास्ट केलाच नव्हता, तो आतंकवादी नाहीये; ममता कुलकर्णी बरळली

खूप प्रेम. लाडका मित्र ,आवड़ता अभिनेता @siddharthbodkeofficial
याशिवाय तिने सिद्धार्थची पत्नी तितिक्षा तावडे हिचेही आभार मानले आहेत. ती म्हणते @titeekshaatawde आमची लाडकी वहिनी तुझं विशेष कौतुक तू क़ायम त्याच्या पाठीशी खंबीर पणे ऊभी राहिलियेस. त्याच्या हया यशात तुझा मोलाचा वाटा आहे.

ऋतुजा सध्या फुडच पाऊल या रेस्टॉरंटच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news