

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक अलीकडेच एका निसर्गिक संकटाचा अनुभव घेतला. रुबिना मागील काही दिवसांपासून हिमाचलमध्ये आहे. या दरम्यान हिमाचलमध्ये प्रचंड पाऊस आणि भूसस्खलनची परिस्थिती आहे. या परिस्थितीत रुबिनासोबत तिच्या दोन मुलीही आहेत. (Latest Entertainment News)
या परिस्थितीत रुबैना आणि तिच्या कुटुंबाला बराच त्रास सहन करावा लागला. याबाबत पोस्ट शेयर करत तिने चाहत्यांशी तेथील परिस्थितीबाबत सांगितले आहे.
रुबिना आपल्या पोस्टमध्ये म्हणते, मागचे पांच दिवस एका रोलर कोस्टर राइडसारखे होते. पाऊस आणि भूसस्खलनाने केवळ शेत आणि रस्तेच प्रभावित झाले नाही तर अनेक कुटुंबही प्रभावित झाली आहेत. भलेही मी आपल्या दोन्ही मुलींना कडेवर उचलून घेऊ शकले नाही. पण ईश्वरकृपेने त्या दोघीही सुरक्षित आहेत.’
यादरम्यान पोस्टमध्ये रुबिनाने त्या हॉटेलचेही आभार मानले आहेत ज्याने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना अशा अडचणीच्यावेळी आधार दिला. यावेळी तिने शेयर केलेल्या व्हीडियोमध्ये हिमाचलमध्ये सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशनही दिसत आहे. यासोबतच रुबिनाने त्या नैसर्गिक संकटात प्रभावित झालेल्या लोकांसंदर्भातही चिंता व्यक्त केली आहे.
हिमाचलमधील मॉन्सूनने यंदा स्वतचे विनाशकारी रूप दाखवले आहे. 20 जूनपासून आतापर्यंत अडीचशेहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. राज्यातील 400 रस्त्यांसह 3 राज्यमार्गही यामुळे प्रभावित झाले आहेत.
रुबिना सध्या पती, पत्नी और पंगा या रिअलिटी शोमध्ये दिसते आहे. यावेळी तिच्या मुली रुबिनाच्या आईसोबत हिमाचलमध्ये आहेत.