RRR and Ramsetu movie : ‘आरआरआर’, ‘रामसेतू’ची रीलिज डेट जाहीर

RRR and Ramsetu movie : ‘आरआरआर’, ‘रामसेतू’ची रीलिज डेट जाहीर

पुढारी ऑनलाईन

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'आरआरआर'या चित्रपटाची रीलिज डेट अखेर घोषित करण्यात आली आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. अजय देवगण याने सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे. चित्रपटात अजयचा कॅमियो असून ज्युनियर एनटीआर, रामचरण तेजा, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्‍नड भाषेत चित्रपट रीलिज होणार आहे.

दरम्यान, अक्षयकुमारच्या 'रामसेतू'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. हा चित्रपटही याचवर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. अभिषेख शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यात जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा यांच्याही भूमिका आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news