

काही महिन्यांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला होता. घरात घुसलेल्या व्यक्तीने सैफच्या पाठीत सूऱ्याने वार केले होते. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेतील सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर रोनित रॉयच्या सिक्युरिटी एजेंसीने सैफला सिक्युरिटी द्यायला सुरवात केली. आता रोनितने एका इंटरव्ह्युमध्ये खुलासा केला आहे की सैफनंतर करीनावरपण हल्ला झाला होता.
एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हा खुलासा केला आहे. रोनित म्हणतो की, सैफवर हल्ला झाल्यानंतर मी बेबोशी बोललो. त्यांच्या घरची रेकी केली. त्यात सुरक्षेच्या दृष्टीने काही बदल केले. सैफ घरी येत होता तेव्हा आसपास खूप गर्दी होती. करीना जेव्हा हॉस्पिटलपासून घरी येत होती त्याचवेळी तिच्या गाडीवर एकदम गर्दी उसळली. अटॅक झाला आहे असा वाटावा अशी ती परिस्थिति होती. मिडियाच्या गर्दीत काही इतर लोकही होते. त्यामुळे कारीनाची गाडी काहीशी हलली होती. त्यामुळे ती खूप घाबरली होती. यानंतर सैफला घरी घेऊन येण्यासाठी मी गेलो होतो.
रोनितला करियरच्या सुरवातीला फारसे काम मिळत नव्हते. घरभाडे देण्याचीही ऐपत नसल्याने तो घरमालकाला चुकवण्यासाठी बाल्कनीमधून ये जा करत असे. रोनितचा मित्र विकास शर्माने त्याला सिक्युरिटी एजन्सी सुरू करण्याचा सल्ला दिला. यावेळी रोनितला सल्ला दिला की 'तुझे सिनेमे चालत नसले तरी तुझे नाव एक ब्रॅंड आहे. हे तुझ्यापासून कोणीच घेऊन जाऊ शकत नाही.’ या वाक्याने मला प्रेरणा दिल्याचे रोनितने यावेळी सांगितले.