धनुष, नागार्जून आणि रश्मिका मंदाना अभिनीत कुबेरा आता ottसाठी सज्ज झाला आहे. 20 जूनला हा सिनेमा थिएटर रिलीज झाला होता. तेल घोटाळ्यावर या सिनेमाची गोष्ट आधारलेली आहे. या व्यवसायातून मिळालेला अवैध पैसा लपवण्यासाठी तो 4 अनामिक लोकांच्या खात्यावर जमा करण्याचे ठरवले जाते.
याकामी 4 भिकाऱ्यांची निवड होते. त्यांच्या नावाने हा पैसा लपवला जातो. यातील एक भिकारी आहे देवा. जी भूमिका धनुषने साकारली आहे. जो अशिक्षित आहे.
तर नागार्जून या सिनेमात एका प्रामाणिक पण व्यवस्थेपुढे शरणागती पत्कराव्या लागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतो आहे. आता हा घोटाळा आणि त्यामध्ये अडकलेला अशिक्षित, हतबल देवा याची गोष्ट म्हणजे कुबेरा सिनेमा. हा सिनेमा थिएटरवर काही खास चमक दाखवू शकला नव्हता.
धनुषचा हा सिनेमा कुबेरा 18 जुलैला प्राइम व्हीडियोवर रिलीज होणार आहे. प्राइम व्हीडियोने शुक्रवारी ही बाब जाहीर केली आहे. एक साधारण मनुष्य प्रायश्चितच्या आपल्या असाधारण यात्रेवर.. असे कॅप्शन देत
शेखर कम्मुला यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा बनला आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना, जिम सरभ, दलीप ताहिल हे कलाकार आहेत. सुनील नारंग आणि पुष्कर राव यांची निर्मिती असलेला हा सिनेमा तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषात रिलीज होणार आहे.
हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादाचे ग्रहण लागले होते. सिनेमा थिएटर रिलीज लांबल्याने ott रिलीजसाठी पुढे ढकलण्याचा निर्मात्यांचा मानस होता. पण प्राइमकडून सांगितले गेले की 'सिनेमा 20 जूनला रिलीज झाला नाहीतर डीलमधून 10 कोटी कट करणार.’ एकंदरीत सिनेमाच्या रिलीजवर ott प्लॅटफॉर्मचा बऱ्यापैकी प्रभाव असल्याचे सिद्ध झाले आहे.