Mismatched Season 3 : रोहित सराफ येतोय मिस्मॅच सीझन ३ मधून, शूटिंग सुरू

rohit saraf
rohit saraf

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षकांच्या भेटीला नॅशनल क्रश रोहित सराफने त्याचा आगामी मिस्मॅच ३ चे चित्रीकरण सुरू केले आहे. (Mismatched Season 3) आता नव्या सीजन ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रोहित ने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रीकरणाची एक झलक शेअर केली आहे आणि शूटिंग सुरू झाल्याची बातमी दिली आहे. रोहित सराफ तिसर्‍यांदा ऋषीच्या भूमिकेत दिसणार आहे. (Mismatched Season 3)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी अभिनीत Netflix ची रोमँटिक वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकर्षक कथानकासाठी ही वेब सीरिज ओळखली जाते आणि मनमोहक केमिस्ट्रीबद्दल सगळेच उत्सुक आहेत. मिस्मॅच सीझन ३ चे शूट सुरू झालं असून आता प्रेक्षक या वेब सीरिज ची वाट पाहत आहेत. रोहितकडेही इश्क विश्क रिबाउंड हा प्रोजेक्ट सुद्धा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news