Housefull 5: पुण्यातील इव्हेंटमध्ये घडले असे काही की अक्षयकुमारला हात जोडून करावी लागली प्रेक्षकांना विनंती

Akshay Kumar Housefull 5 Event in Pune: अक्षय कुमारचा आगामी हाऊसफुल 5 या सिनेमाचे सध्या प्री रिलीज प्रमोशन सुरू आहे.
Entertainment News
हाऊसफुल 5 इव्हेंटpudhari
Published on
Updated on

Akshay Kumar Housefull 5 Event in Pune

पुणे : अक्षय कुमारचा आगामी मल्टीस्टारर सिनेमा हाऊसफुल 5 सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे सध्या प्री रिलीज प्रमोशन सुरू आहे. यासाठी सिनेमाची टीम अनेकठिकाणी हजेरी लावते आहे. अर्थात सिनेमातील कलाकारांचे फॅन्स त्यांना पाहण्यासाठी कायमच गर्दी करतात. पण हे फॅन्स कधी कधी सेलिब्रिटींनाही डोक्याला ताप करून ठेवतात. आताही असेच काहीसे घडले आणि अक्षय कुमारला चक्क चाहत्यांसामोर हात जोडावे लागले. पुण्यात हाऊसफुल 5 च्या प्रमोशन इव्हेंट दरम्यान झालेल्या गर्दीने परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती.

अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, सोनं बाजवा आणि इतर स्टारकास्ट पुण्यात एकेठिकाणी प्रमोशनसाठी पोहोचली होती. या ताऱ्यांना पाहण्यासाठी आलेली गर्दी मात्र आवाक्याबाहेर वाढली होती. हे सेलिब्रिटी स्टेजवर आले तोच समोर असलेल्या गर्दीने प्रचंड गोंधळ करायला सुरू केला. यावेळी धक्काबुक्की इतकी वाढली शेवटी अक्षयला स्वत:ला उठून फॅन्सना शांत राहण्याची विनंती करावी लागली. Akshay Kumar in Housefull 5

काही चाहते या सेलिब्रिटींना पाहून रेलिंग ओलांडून यायचा प्रयत्न करू लागले. यादरम्यान एक मुलगा गर्दीत अडकला व मोठ्याने रडू लागला. यावेळी जॅकलीन आणि सोनम स्टेजवरून खाली आल्या आणि त्यांनी या मुलाला धीर देत त्याला शांत केले.

Entertainment News
Ashok Saraf | दिलखुलास अशोक सराफ ! ५८ वर्षांच्या चित्रपट सृष्टीतील उलगडला प्रवास

एक महिलाही या गोंधळामुळे रडू लागली. यावर अक्षयने माईक घेत चाहत्यांना आवाहन केले की गर्दीत महिला आणि मुळे आहेत त्यामुळे धक्काबुक्की करू नका. हाऊसफुल 6 जूनला रिलीज होतो आहे.

Entertainment News
Mamta Kulkarni | ''माझ्या २५ वर्षांच्या 'तपस्येचे' फळ देवाने मला दिले..'' ३ महिन्यांनंतर ममता कुलकर्णीने सोडले मौन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news