Raja Shivaji Day 20: ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; 20 व्या दिवशीही कोट्यवधींची कमाई, इतिहासापासून फक्त 12 कोटी दूर

Raja Shivaji box office collection Day 20: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने रिलीजच्या 20 व्या दिवशीही दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली आहे.
Raja Shivaji box office collection Day 20
Raja Shivaji box office collection Day 20Pudhari
Published on
Updated on

Raja Shivaji box office collection Day 20: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड थांबण्याचं नाव घेत नाहीये. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही प्रेक्षकांचा प्रतिसाद तसाच कायम आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने देशासह जगभरात दमदार कमाई केली असून आता मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर तो पोहोचला आहे.

20 व्या दिवशी किती कमाई?

सुरुवातीपासूनच दमदार ओपनिंग मिळालेल्या ‘राजा शिवाजी’ने तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली आहे. सामान्यतः बायोपिक किंवा ऐतिहासिक चित्रपटांची कमाई तिसऱ्या आठवड्यात मंदावते. मात्र ‘राजा शिवाजी’ दररोज कोटींच्या घरात कमाई करत असल्याचं दिसत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाने 20 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या बुधवारी सुमारे 1.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 19 व्या दिवसाच्या तुलनेत किंचित घसरण झाली असली, तरी चित्रपटाचा वेग कायम असल्याचं दिसून येत आहे.

20 दिवसांचं एकूण कलेक्शन किती?

चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आठवड्यात आणखी 24.30 कोटी रुपयांची भर पडली.

तिसऱ्या आठवड्यातील कमाई अशी:

  • 15 वा दिवस – 1.45 कोटी

  • 16 वा दिवस – 2.70 कोटी

  • 17 वा दिवस – 3.45 कोटी

  • 18 वा दिवस – 1.15 कोटी

  • 19 वा दिवस – 1.30 कोटी

  • 20 वा दिवस – 1.10 कोटी

यासह चित्रपटाचं 20 दिवसांचं एकूण नेट कलेक्शन 88.10 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

Raja Shivaji box office collection Day 20
Amitabh Bachchan health update | अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर, खरंच रुग्णालयात दाखल केलंय का? सत्य काय?

100 कोटी क्लबपासून किती दूर?

‘राजा शिवाजी’ने वर्ल्डवाइड कमाईत आधीच 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता भारतातील नेट कलेक्शनच्या बाबतीतही चित्रपट मोठा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

मराठी सिनेसृष्टीतील 100 कोटींचा नेट आकडा पार करणारा पहिला चित्रपट बनण्यासाठी ‘राजा शिवाजी’ला आता अवघ्या 12 कोटी रुपयांची गरज आहे. सध्याचा वेग पाहता, चौथ्या आठवड्याच्या शेवटी हा विक्रम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Raja Shivaji box office collection Day 20
Trisha-Suriya Karuppu BO | एकीकडे थलपतीचा 'विजय' तर दुसरीकडे त्रिशा कृष्णन, सूर्यासोबत मिळून मिळवले तब्बल इतके कोटी; 'कंगुवा'ला पछाडलं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला महाराष्ट्रासह देशभरातून मिळणारा प्रतिसाद पाहता, ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवरील विजयाचा झेंडा आणखी उंचावण्याची चिन्ह दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news