Raja Shivaji Movie: ‘तुमच्या भावना समजतात, पण...’; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची कळकळीची विनंती

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असताना रितेश देशमुखने चाहत्यांना एक खास विनंती केली आहे. थिएटरमधील दृश्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करू नका, असे आवाहन त्याने केले.
Riteish Deshmukh Raja shivaji
Riteish Deshmukh Raja shivajiPudhari
Published on
Updated on

Riteish Deshmukh Requests Fans: ‘राजा शिवाजी’ हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये या सिनेमासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच सोशल मीडियावर या सिनेमातील अनेक दृश्यांचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. यानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने प्रेक्षकांना एक भावनिक आणि कळकळीची विनंती केली आहे.

रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट लोकांनी आपलाच समजून स्वीकारल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. चित्रपटाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून संपूर्ण टीम भारावून गेल्याचेही त्याने सांगितले.

Riteish Deshmukh Raja shivaji
Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई, 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

मात्र, याच वेळी त्याने प्रेक्षकांना एक विनंती केली. अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात सिनेमातील खास दृश्यांचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले. उत्साह आणि प्रेमामुळे लोक असे करत असल्याची जाणीव असल्याचे सांगत, कृपया चित्रपटातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत, असे आवाहन त्याने केले.

रितेशने स्पष्ट केले की, सिनेमात काही खास प्रसंग आणि सरप्राईज एलिमेंट्स आहेत. जर हे व्हिडीओ आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले, तर अजून चित्रपट न पाहिलेल्या प्रेक्षकांचा अनुभव खराब होऊ शकतो. लोकांनी थिएटरमध्ये येऊन तो अनुभव स्वतः घ्यावा, अशी त्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. फोटो शेअर करण्यास हरकत नसली तरी संपूर्ण दृश्यांचे व्हिडीओ पोस्ट करू नका, असे त्याने नम्रपणे सांगितले.

Riteish Deshmukh Raja shivaji
Raja Shivaji Movie : शिवाजी महाराजांच्या भावविश्वाचा वेध - राजा शिवाजी

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिसवरही दमदार सुरुवात केली आहे. ट्रेड रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल १२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील मोठ्या ओपनिंगपैकी हा एक मानला जात आहे. ऐतिहासिक विषय, भव्य मांडणी आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षक सिनेमाला मोठ्या प्रमाणावर पसंती देताना दिसत आहेत.

या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. सिनेमातील भव्य दृश्यरचना, पार्श्वसंगीत आणि भावनिक प्रसंग यांमुळे प्रेक्षक भारावून जात असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news