Riteish Deshmukh
Riteish Deshmukh shared Raja Shivaji movie posterinstagram

Riteish Deshmukh Raja Shivaji | 'आपला राजा.. आपला अभिमान', रितेशने शेअर केलं ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर

Riteish Deshmukh Raja Shivaji -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित राजा शिवाजी चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं
Published on
Summary

अभिनेता रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत “आपला राजा… आपला अभिमान” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. पोस्टरमुळे सोशल मीडियावर उत्सुकता वाढली असून हा चित्रपट ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Riteish Deshmukh Raja Shivaji poster released

छत्रपती शिवाजी महाराज...स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे पोस्टर शिवजयंती दिनी रिलीज करण्यात आले. रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केले आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत हा चित्रपटा पाहता येणार आहे.

रितेश देशमुखने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय- आज तोच दिवस आहे, जेव्हा अंधाराला पहिल्यांदा प्रकाशाचं स्वप्न पडलं.. जेव्हा इतिहासानं नव्या भविष्याकडे पाउल उचललं... जेव्हा आपल्या मातीला मिळाला नवा स्वाभिमान.. शिवजयंतीच्या पावन निमित्ताने, Jio Studios आणि Mumbai Film Company सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित #राजाशिवाजी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर ! आपला राजा.. आपला अभिमान... दिग्दर्शक @riteishd घेऊन येत आहेत आपल्या राजाची गाथा - कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व रूपात!!! #राजाशिवाजी.

Riteish Deshmukh
filmmaker Vikram Bhatt bail multi-crore biopic scam |अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर निर्माते विक्रम भट्ट, पत्नीला अंतरिम जामीन मंजूर

पोस्टरमध्ये अभिनेते-दिग्दर्शक रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात प्रभावशाली दिसत आहे. त्यांच्या हातात फडकणारा भगवा ध्वज, करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले त्याचे व्यक्तिमत्व सर्व लक्ष वेधून घेत आहे.

या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार दिसणार आहे. संगीत सम्राट अजय-अतुल यांचे आहे. छायाचित्रकार संतोष सिवन या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. निर्माते ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांचा चित्रपट 'राजा शिवाजी' १ मे २०२६ रोजी जगभरातील सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Riteish Deshmukh
Border 2-O Romeo BO collection : २७ दिवस 'बॉर्डर-२' ची भरभरून कमाई; 'ओ रोमियो'ला कसा प्रतिसाद?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news