Riteish Deshmukh Genelia Birthday: वेडी बायको.. मला वाटतंय मीच म्हातारा होतोय.. पत्नीच्या वाढदिवसाला रितेश भलताच रोमँटिक झाला

Riteish Deshmukh Genelia Birthday
Riteish Deshmukh Genelia Birthdaypudhari
Published on
Updated on

Genelia Birthday Riteish Deshmukh: प्रसिद्ध अभिनेत्री जेनिलिया देशमुख आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता रितेश देशमुखने आपल्या लाडक्या पत्नीसाठी ढीगभर फोटो आणि एक भन्नाट कॅप्शन टाकत रोमँटिक पोस्ट केली आहे. त्याने आपल्या वेड्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून त्याच्या पोस्टमधून या दोघांमधील केमेस्ट्री लग्नाला इतके वर्षे उलटून देखील जबरदस्त असल्याचं दाखवून दिलं.

Riteish Deshmukh Genelia Birthday
Riteish Deshmukh ST Brand Ambassador: एसटीतील साहेबांचा 'तो' फोटो आमच्या खूप जवळचा... ब्रँड ॲम्बेसेडर होताच रितेश आठवणीत रमला

रितेशची खास पोस्ट

रितेश देशमुख आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'मी आपण एकत्र शेअर केलेल्या, निर्माण केलेल्या आठवणींना उजाळा देत होतो आणि माझ्या लक्षात आल की या प्रवासात फक्त मीच म्हातारा होत आहे. तू वेळ गोठवली असल्यासारखं वाटतंय. मला वाटतं की तुला एक चांगला नवरा मिळाला आहे त्यामुळं असं झालं असावं.

रितेश पोस्टमध्ये पुढे म्हणतो की, 'सुपर मॉम, चांगली मुलगी, प्रेमळ बहीण आणि माझी वेडी बायको... आमचं कुटुंब एकत्र बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! आय लव्ह यू'

Riteish Deshmukh Genelia Birthday
Riteish Deshmukh handling kids|जेव्हा मुले घरात त्रास देतात, तेव्हा काय करतो रितेश देशमुख? वापरतो 'ही' भन्नाट ट्रिक

रोमँटिक कपल

जेनिलिया आणि रितेश हे बॉलिवूडमधील एक रोमँटिक आणि आदर्श कपल असून त्या दोघांच्या बाँडिंगची नेहमी चर्चा असते. नुकतेच रितेश देशमुख हा राजा शिवाजी या चित्रपटात मुख्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसला होता. त्या चित्रपटात जेनिलिया देशमुखने छित्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांची भूमिका साकारली होती.

Riteish Deshmukh Genelia Birthday
Riteish Deshmukh rules in own house | रितेश देशमुखने जेनेलियासाठी ठेवलेत 'हे' खास नियम; मुलेही म्हणतात- 'बाबा आता बस...'

रितेश सध्या लॉकअप या रिअलिटी शो होस्ट करतो आहे. नुकतेच सलमान खानने त्याबाबत वक्तव्य करून त्याला पुन्हा चर्चेत आणलं होतं. सलमान खानचा भाऊ सोहेल खानने अलायन्स या रिअलिटी शोमध्ये भाग घेतला असून सलमान आपल्या भावाचा उत्साह वाढवण्यासाठी तिथं गेला होता. त्यावेळी सलमानने रितेश उद्येशून एक वक्तव्य केलं होतं ते जास्त चर्चेत आलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news