Ritabhari Chakraborty : बंगाली सुपरस्टार रिताभरीने लंडनमध्ये साजरा केला बर्थडे

Ritabhari Chakraborty
Ritabhari Chakraborty
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती यावर्षी तिने तिचा वाढदिवस एका अनोख्या आणि उत्साही पद्धतीने साजरा केला. (Ritabhari Chakraborty) रिताभरी सध्या लंडन शहरात तिच्या बहुप्रतीक्षित बंगाली प्रकल्पाच्या सेटवर काम करत असल्याचं समजतंय. यंदा ती तिचा वर्किंग वाढदिवस लंडनमध्ये खास प्रकारे सेलिब्रेट करतेय. (Ritabhari Chakraborty)

२६ जून रोजी जन्मलेल्या रिताभरी चक्रवर्तीने तिच्या अनोख्या प्रतिभा शैलीने आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. नाव लौकीक मिळवून ती अनेक बंगाली सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत आहे.

रिताभरी या खास वाढदिवसाविषयी उत्साह व्यक्त करताना म्हणते, "मला सर्वात जास्त जे काम करतेय ते करत असताना माझा वाढदिवस साजरा करू शकले हे मी अत्यंत भाग्यवान समजते. सेटवर असणे आणि अशा प्रतिभावान व्यक्तींसोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून मी कृतज्ञ आहे."

Ritabhari Chakraborty
Ritabhari Chakraborty

चाहते या प्रकल्पाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सेटवर रिताभरी तिचा वाढदिवस साजरा करते आहे हे तिच्या कलेबद्दलचे तिचे अतूट प्रेम दाखवून देत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news