Bigg Boss Voice: बिग बॉसचा आवाज असलेले विजय विक्रम सिंह यांना किती पैसे मिळतात?

या शोमधून त्यांना जास्त पैसे तर मिळाले नाहीत
Entertainment
बिग बॉसचा आवाज विजय विक्रम सिंह Pudhari
Published on
Updated on

रिअलिटी शोच्या जगात लोकप्रिय असलेला शो म्हणजे बिग बॉस. या शोच्या प्लॉटसोबत आवर्जून चर्चा होते ते बिग बॉसच्या आवाजाची. बिग बॉसच्या या दमदार आवाजाचे अनेक फॅन्स आहेत. तुम्हाला माहिती आहे का? विजय विक्रम सिंह असे बिग बॉसचा आवाज असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Latest Entertainment News)

नुकतीच एका मुलाखतीमध्ये विजय यांनी शोमधून कमाई तसेच आणखी इतर बाबींवर खुलून गप्पा मारल्या आहेत. ते म्हणाले, की या शोमधून त्यांना जास्त पैसे तर मिळाले नाहीत. पण या शोने त्यांना त्यांची ओळख दिली आहे. मी बिग बॉसमधून जास्त कमवत नाही. पण बिग बॉसमुळे जास्त कमावतो आहे. हा शो माझी ओळख आहे. हा शो मी केवळ पैशांसाठी नाही तर प्रेम आणि सन्मान यासाठी करतो आहे. हा शो माझ्यासाठी केवळ नोकरी नाही तर माझ्या जीवनाचा एक मुख्य हिस्सा आहे.

Entertainment
Marathi Serial Update: ठरलं तर मग ! अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजी; लूक आला समोर

विजय विक्रम सिंह चौथ्या सीझनपासून बिग बॉसच्या घराशी जोडले आहेत. बिग बॉसच्या शोचा इतका महत्त्वाचा भाग असूनही त्यांना अत्यंत अल्प मानधन मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच चौथ्या सीझनपासून त्यांना आतापर्यंत तीन वेळा पैसे वाढवून दिले गेले पण अत्यंत अल्प प्रमाणात. हा शो माझ्यासाठी पैशाहून जास्त आहे हे मी जाणून आहे.

Entertainment
Bollywood Actress: आधी राष्ट्रीय पुरस्कार मग डिप्रेशन........बॉलीवुड सोडल्यानंतर दंगल सिनेमातील ही अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत

अभिनय कौशल्यही वादातीत

आवाजच नाही तर विजय विक्रम सिंग अभिनयातही आपले नाव आजमावले आहे. द फॅमिली मॅन या सिरीजमध्ये ते झळकले आहेत.

याशिवाय मिर्झापूर 2, ब्रीद 2 आणि स्पेशल ओप्स 1.5 सारख्या लोकप्रिय सिरिजमध्येही ते दिसले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news