पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमधील पॉवर कपलपैकी एक रिचा चढ्ढा आणि अली फझल हे दोघे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनाही लवकरच लग्न करायचे आहे. हे कपल आता सप्टेंबरमध्ये लग्न करणार आहे. त्याआधी रिचाचा नवा लूक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यलो साडीमध्ये रिचा (Richa chadha ) नटलेली दिसते. यलो साडी त्यावर शोभेल अशी ज्वेलरी आणि हातात गुलाबाचे फुल धरत रिचाने काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मोकळ्या केसांमध्ये तिचे रुप आणखी बहरलं आहे. (Richa chadha )
तिने या फोटोंना ellow yellow pretty fellow ? अशी कॅप्शन लिहिलीय. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनाही कमेंट करण्याचा मोह आवरता आला नाही. एका नेटकऱ्याने लिहिलंय-If the sun was the moon it would look like this right here ?, The prettiest ❤️❤️❤️❤️, Yellow is your color ❤️, Shaadi confirmed?, Wow stunning ?, So so pretty in yellow ?.
या जोडप्याचे लवकरच लग्न कधी होणार, याची प्रतीक्षा चाहत्यांना लागून राहिली आहे. याआधी हे जोडपे २०२० मध्ये लग्न करणार होते. पण कोरोना काळात ते होऊ शकले नाही. पण आता दोघेही लग्न करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, रिचा आणि फजल अली या वर्षी सप्टेंबर महिन्यात लग्न करणार आहेत. लग्नानंतर हे कपल ग्रॅण्ड रिसेप्शन देण्याचीही तयारी करत आहे. जोडप्याच्या रिसेप्शनला ४०० अतिथी उपस्थित राहू शकतात.
अली फजल आणि रिचा दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अशा परिस्थितीत हे जोडपे आता लग्नाच्या बेडीत अडकणार असून, त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या वर्षी दोघांचे लग्न होणार आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, रिचा आणि अली सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या दोघांचे लग्न दिल्लीत होणार आहे. संगीत आणि मेहंदी समारंभाने दोघांचे लग्न होणार आहे. यानंतर, हे कपल मुंबईत एक रिसेप्शन आयोजित करेल, ज्यामध्ये ३५० ते ४०० लोकांना आमंत्रित केल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी, एका इंग्रजी दैनिकाशी संवाद साधताना अली फजलने त्याच्या लग्नाच्या तारखेबद्दल सांगितले होते. लग्नाला झालेल्या विलंबाबाबत बोलताना तो म्हणाला की, सर्व परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर आम्ही आमच्या लग्नाकडे धाव घेतली आणि आमचे वचन पूर्ण केले.