गुजरातची रिया सिंघा बनली मिस युनिव्हर्स इंडिया, उर्वशी रौतेलाने घातला मुकूट

Rhea Singha ने जिंकली Miss Universe India 2024 स्पर्धा
Miss Universe Indian 2024
गुजरातची रिया सिंघा हिला मिस युनिव्हर्स इंडिया २०२४चा मुकूट मिळाला आहे.Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क- मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये रिया सिंघाने बाजी मारली . ग्रँड फिनाले राजस्थानच्या जयपूरमध्ये रविवार, २२ सप्टेंबर रोजी आयोजित केलं गेलं होतं. या स्पर्धेत १९ वर्षीय रिया सिंघाला मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ चे मुकूट घातले. हा आनंदाच्या क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी भारताच्या रिया सिंघाला मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ चे मुकूट घालण्यात आले. यामध्ये रियाने विजेतेपद जिंकले. यावेळी अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स इंडिया २०१५ उर्वशी रौतेलाने रियाला मुकूट घातला. निकाल घोषित होताच सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. यावेळी रिया भावूक झालेली दिसली. रिया म्हणाली, आता रिया वैश्विक मिस युनिव्हर्स २०२४ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल.

कोण आहे रिया सिंघा?

मिस युनिव्हर्स इंडिया जिंकणारी रिया सिंघा १९ वर्षांचाी आहे. ती गुजरातची असून एक मॉडल आहे. सोशल मीडियावर ती खूप ॲक्टिव्ह राहते. तिचे इन्स्टाग्रामवर ४० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या बोल्ड अंदाजामुळे ती प्रसिद्ध आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news