

Rayvanny Nora Fatehi Shreya Ghoshal oh mama tetema video
मुंबई - नोरा फतेहीचा Oh Mama Tetema नावाच्या म्युझिक व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. टांझानियाचा गायक रेवन्नीसोबत तिचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो इन्स्टाग्राम आणि यु-ट्यूबवर ट्रेंडवर आहे. जेसन देरुलोसोबत तिने यश मिळवल्यानंतर टांझानियन सेंसेशन रेवन्नीसोबत ग्लोबल फ्युजन सॉन्गमध्ये दिसली. आफ्रीकी-बोंगो धुनचे मिक्सिंग पाहायला मिळत आहे. तसेच अनेक भाषा आणि संस्कृतींची झलक पाहायला मिळत आहे.
Oh Mama! Tetema या गाण्याची क्रेझ सध्या सुरु आहे. हे गाणे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल. डार्क ब्राऊन कलर आऊटफिटमध्ये नोराचे किलर डान्स मुव्ह्ज घायाळ करणारे आहेत. 10 ऑगस्टला टी-सीरीजच्या बॅनर अंतर्गत यु-ट्यूबवर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.
यावेळी ती केवळ व्हिज्युअल हायलाईट झाली नाही तर एक गायिका म्हणून ही समोर आलीय. इंग्लिश, स्वाहिली, हिंदी भाषेतील सुरांनी तिने सिग्नेचर `स्वॅग आणि स्पाईस` सादर केले आहे.
गाण्यात ती क्रॉप टॉप आणि जॉगर्समध्ये दिसते. तिच्या डान्समध्ये प्रचंड उत्साह आणि कमालीचे एक्सप्रेशन्स आहेत. नोराने माहिती शेअर करत म्हटले होते-“गर्मीचे गाणे आले आणि आम्ही खुद्द बॉस सोबत डान्स विथ नोराची सुरुवात करत आहोत. Oh Mama Tetema चे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफरच्या जोडीने संगीतप्रेमींच मन जिंकलं आहे. श्रेया घोषाल सोबत रेवन्नी आणि नोरा फतेहीचा आवाजदेखील चर्चेत आहेत. विशाल मिश्रा यांचे संगीत आहे. आतापर्यंत गाण्याला दोन दिवसांत 9,886,707 इतके views मिळाले आहेत.
डान्स विथ नोराची सुरुवात नोरा फतेहीने Oh Mama Tetema डायरेक्टर आणि कोरियोग्राफर म्हणून केली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. तरुणाईला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.