

Rashmika Vijay Wedding Date: दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील दोन स्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती आता त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. नव्या वर्षात हे दोन लव्ह बर्ड कपल लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. दोघांचे चाहते या विवाह सोहळ्यासाठी उत्सुक आहेत.
हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार रश्मिका आणि विजय देवरकोंडा २०२६ मध्ये शाही थाटात लग्न करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे दोन स्टार्स २६ फेब्रुवारी २०२६ मध्ये राजस्थानमधील ऐतिहासिक शहर उदयपूरच्या एका शाही पॅलेसमध्ये सात फेरे घेणार आहेत. त्यांचे प्री वेडिंग फंक्शन देखील होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या कपलने आपल्या लग्नासाठी शहरातील एक हेरिटेज प्रॉपर्टी देखील फायनल केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रश्मिका अन् विजय देवरकोंडा उदयपूरच्या एका महालात लग्न करणार आहेत.
रश्मिका अन् विजय देवरकोंडा हे साखपुड्यासारखं आपलं लग्न देखील फक्त कुटुंबापुरतं मर्यादित ठेवणार आहेत. या लग्नासाठी दोन्ही कलाकारांचे कुटुंबीय अन् जवळचे नातेवाईकांनाच आमंत्रण देण्यात येणार आहे. रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे इंडस्ट्रीमधील आपल्या कोणत्या मित्रांना बोलवणार आहेत का नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. ते इंडस्ट्रीतील लोकांसाठी वेगळं रिसेप्शन ठेवणार आहेत की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे एकमेकांना बराच काळ गुप्तपणे डेट करत होते. मात्र त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. अखेर त्यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये साखरपुडा केला होता. हा साखपुडा देखील कुटुंबियांपुरताच मर्यादित होता.
आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. विजय किंवा रश्मिकाने अजून आपल्या लग्नाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. एवढंच काय तर या दोघांनी डेटिंग, साखरपुडा याच्या वृत्ताला देखील अधिकृत दुजोरा दिलेला नाही.