Aamir Khan met Salim Khan | सलीम खान यांच्या तब्येतीबद्दल आमिरची मोठी अपडेट! नेमकं काय म्हणाला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’?

Aamir Khan met Salim Khan | सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल आमिर खानने दिली हेल्थ अपडेट, रुग्णालयात दुसऱ्यांदा भेटीला
aamir khan
Aamir Khan met Salim Khan gave health update x account
Published on
Updated on
Summary

सलीम खान यांच्या तब्येतीबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आमिर खान यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

Aamir Khan met Salim Khan gave health update

सलमान खानचे वडील, दिग्गज स्क्रिप्ट रायटर सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी अभिनेता आमिर खानने मोठी अपडट दिलीय. आमिर खान बुधवारी मुंबई प्रेस क्लबमधील एका कार्यक्रमात सहभागी झाला. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “मी सलीम साहेबांना भेटायला गेलो होतो. आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहे की, ते लवकरात लवकर बरे व्हावेत. कारण, ते आयसीयुमध्ये होते. मी त्यांना वैयक्तिक भेटू शकलो नाही. मी त्याच्या परिवारासोबत बसलो होचो. मला अलवीराजी प्रत्येक दिवशी प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगत आहे. आम्ही सर्व जण प्रार्थना करत आहोत. प्रार्थना करत आहोत की, ते पुन्हा एकदा घरी परतावेत.”

aamir khan
Singer-composer Leslee Lewis | लेस्ली लुईस यांची तब्बल २६ वर्षांनंतर वापसी! नव्या गाण्याची धूम

आमिर खान दुसऱ्यांदा भेटीला

बुधवारी रात्री सायंकाळी आमिर खान दुसऱ्यांदा लीलावती रुग्णालयात सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचचला. याआधी आमिर त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट सोबत १९ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात आले होते.

डेजी शाह म्हणाली..

सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी अभिनेत्री डेजी शाहने देखील म्हटलं होतं की, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. जय हो चित्रपटात सलमान खानची को-स्टार डेजी शाह होती. ती म्हणाली- “मैं सलीम सरांना भेटू शकले नाही. पण सलमान सर आणि त्यांच्या परिवाराशी संपर्कात आहे. सलीम सर आता ठिक आहेत. त्यांची तब्येत स्थिर आहे. सर्जरी यसस्वी झालीय. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि धोक्यातून बाहेर आहेत.”

aamir khan
Akshay Kumar Bhooth Bangla First Song: अक्षय कुमारचा स्वॅगचं न्यारा, ‘भूतबंगला’मधील भन्नाट अंदाज

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news