Rashmika-Vijay Devarakonda engagement | 'या' लव्हबर्ड्सने गुपचूप उरकला साखरपुडा! लग्नाची तारीखही ठरली?

Vijay-Rashmika wedding | रश्मिका-विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली? खासगी समारंभात केला साखरपुडा!
image of Rashmika-Vijay Devarakonda
Rashmika-Vijay Devarakonda got engaged said report Instagram
Published on
Updated on

Vijay-Rashmika Wedding date confirm?

मुंबई - नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आलीय. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु होती. तर अनेकवेळी दोघे एकत्र स्पॉट झाल्याने शिवाय दोघांनीही एकाच प्रकारचे टी-शर्ट घातल्यानंतरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. आता त्या दोघांनी साखरपुडा केला आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी एका खासगी समारंभात साखरपुडा केल्याची माहिती मिळतेय. शिवाय विजयच्या टीमने लग्नाच्या तारखेबद्दल खुलासा केला आहे.

image of Rashmika-Vijay Devarakonda
Akshay Kumar Daughter Nitara | 'तुझे न्यूड पिक्चर पाठवशील का?' अक्षय कुमारच्या मुलीसोबत घडला धक्कादायक प्रसंग

विजय आणि रश्मिका दोघे दीर्घकाळ एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण, दोघांनी आपले नाते सार्वजनिक केले नाही. दोघे अनेकदा रेस्टॉरंट, व्हेकेशनवर स्पॉट झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी एका खासगी समारंभात साखरपुडा केला आहे. हा सोहळा अगदी मोजक्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडल्याचं बोललं जातंय. जरी दोन्ही कलाकारांकडून अद्याप अधिकृत घोषणाच झालेली नाही, तरी सोशल मीडियावर या बातमीने धुमाकूळ घातला आहे.

रश्मिका आणि विजय या दोघांच्या प्रेमकथेची सुरुवात चित्रपटांच्या सेटवरून झाली असल्याचं म्हटलं जातं. एकत्र काम करताना या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यातून त्यांचं नातं फुललं. चाहते अनेकदा या जोडप्याला एकत्र पाहिलं गेलं आहे. अगदी सुट्ट्यांपासून ते कौटुंबिक समारंभांपर्यंत, विजय आणि रश्मिकाची जोडी चर्चेत राहिली आहे.

कधी होणार लग्न?

विजय देवरकोंडाच्या टीमने एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना ही पुष्टी केली की, रश्मिका - विजय पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नबंधनात अडकतील. पण अद्याप याबाबत रश्मिका वा विजयने कोणतीही अधिकृत पोस्ट वा स्टेटमेंट केलेले नाही.

image of Rashmika-Vijay Devarakonda
Ranapati Shivray Release Date | दिग्पाल लांजेकर यांच्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ची रिलीज डेट फिक्स!

चित्रपटांचा प्रवास

रश्मिका 'कुबेरा'मध्ये दिसली होती. आता ती दिवाळी २०२५ रोजी रिलीज होणाऱ्या 'थामा' नावाच्या हॉरर-कॉमेडी दिसेल. यामध्ये आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल देखील आहेत. शिवाय, ती कॉकटेल २, द गर्लफ्रेंड आणि मायसा सारख्या चित्रपटात दिसणार आहे. विजय देवरकोंडा 'किंगडम'मध्ये दिसला होता. ज्यामध्ये सत्यदेव आणि भाग्यश्री बोर्से यांची मुख्य भूमिका होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news