Rashmika Mandanna Mysaa first look | 'ही तर फक्त हिमनगाची एक छोटीशी झलक..' रश्मिकाच्या ‘मायसा’ची पहिली झलक अंगावर काटा आणणारी!

Rashmika Mandanna Mysaa first look | 'ही तर फक्त हिमनगाची एक छोटीशी झलक..' रश्मिकाच्या 'मायसा'ची पहिली झलक
image of Rashmika Mandanna
Rashmika Mandanna Mysaa first look out x account
Published on
Updated on
Summary

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्या आगामी चित्रपट ‘मायसा’ची पहिली झलक नुकतीच समोर आली असून तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. “ही तर फक्त हिमनगाची एक छोटीशी झलक” असा कॅप्शन देत रश्मिकाने हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या पोस्टरमधील तिचा रॉ, तीव्र आणि आक्रमक लूक पाहता ‘मायसा’मधील तिची भूमिका अत्यंत वेगळी आणि दमदार असणार, हे स्पष्ट होत आहे.

actress Rashmika Mandanna Mysaa first look released

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आगामी चित्रपट ‘मायसा’ची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. या फर्स्ट लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. रश्मिकाने स्वतः हा पोस्टर शेअर करत “ही तर फक्त हिमनगाची एक छोटीशी झलक” अशी कॅप्शन दिली आहे.

या पहिल्या झलक मध्ये रश्मिका पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहे. चेहऱ्यावर राग, डोळ्यांत तीव्र भावना, हे सगळं पाहता ‘मायसा’मधील तिची भूमिका अत्यंत भावनिक आणि ताकदवान असणार, हे स्पष्ट होतं. आतापर्यंत ‘क्यूट’ किंवा रोमँटिक भूमिकांसाठी ओळखली जाणारी रश्मिका, या चित्रपटातून नव्या अवतारात दिसणार आहे. ‘पुष्पा’, ‘अ‍ॅनिमल’सारख्या चित्रपटांनंतर रश्मिका सतत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडताना दिसत आहे.

image of Rashmika Mandanna
Dhurandhar worldwide box office collection | 'धुरंधर'ने तिसऱ्या आठवड्यात घडवला इतिहास, आता चार अंकी कलेक्शनकडे वाटचाल!

रश्मिकाने पोस्टमध्ये काय म्हटलंय?

''मायसा. ही तर फक्त हिमनगाची एक छोटीशी झलक आहे. आम्हाला फक्त एका संध्याकाळी तुमच्यासाठी काहीतरी मजेशीर करायचं होतं, जेणेकरून तुम्हाला आता जग कसं आहे ते दिसावं आणि गंभीर गोष्टींबद्दल बोलायचं तर? ओहोहोहोहोहो, ते तुम्ही काही महिन्यांत पाहाल. तर मजा करा! #नाव_लक्षात_ठेवा.''

व्हिडिओमध्ये चित्रपट त्याच्या सुरुवातीच्या प्रदर्शनापासूनच चर्चेत आहे. साऊथला या चित्रपटाची खूप चर्चा आहे. एक शक्तिशाली कथा, भयानक जळत्या जंगलाचे दृश्ये आणि शक्तिशाली संगीतामुळे एक लेगळे आणि प्रभावी वातावरण निर्माण झाले आहे. इमोशनल अॅक्शन थ्रिलर या चित्रपटात रश्मिका एका गोंड महिलेची भूमिका साकारत आहे.

image of Rashmika Mandanna
Salman Khan | सलमानसोबत MS Dhoni चा थ्रो-बॅक फोटो व्हायरल, 'Battle of Galwan' संदर्भात आली नवी अपडेट

तिच्यात उग्रता, राग दिसून येतो. अनफॉर्म्युला फिल्म्स निर्मित आणि रवींद्र पुले दिग्दर्शित हा चित्रपट आहे. आदिवासी भागांच्या पार्श्वभूमीवर आधारित हा एक भावनिक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून रश्मिका मंदान्ना कोणती कथा घेऊन येते, याकडे फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news