

मागील आठवड्यात हैदराबादमध्ये अत्यंत वैयक्तिक पद्धतीने रश्मिका आणि विजय देवरकोंडाने साखरपुडा केला. हे रियल लाईफ गीतागोविंदम लवकरच लग्नाच्या बंधनातही अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी विजय एका कार्यक्रमात गेला असता त्याच्या हातातील साखरपुड्याची अंगठी व्हायरल झाली होती. विजय सत्यसाई बाबाच्या महासमाधीच्या ठिकाणी गेला असता हा व्हीडियो व्हायरल झाला आहे. (Latest Entertainment News)
आता रश्मिकाची साखरपुड्याची अंगठी व्हायरल होते आहे. रश्मिकाचा तिचे पाळीव श्वान ऑरासोबतचा व्हीडियो व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्या हातातील साखरपुड्याची अंगठीही दिसते आहे. या रिंगने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यावेळी एकाने कमेंट केली 'ही अंगठी', दूसरा म्हणतो 'शेवटी आम्हाला अंगठी दिसलीच'. 3 ऑक्टोबरला या जोडीचा साखरपुडा पार पडला. ही जोडी जवळपास 7 वर्षे एकमेकांसोबत आहे. गीतागोविंदम पासून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय त्यांनी डियर कॉमरेड या सिनेमातही एकत्र काम केले आहे. या दोघांनी आतापर्यंत एकदाही आपल्या नात्याबाबत उघड काही मांडले नाही. आता ही जोडी फेब्रुवारीमध्ये लग्नाच्या बेडीत अडणार असल्याचे बोलले जात आहे.
रश्मिका आता थामा नावाच्या सिनेमात दिसणार आहेत. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमात रश्मिका हटके भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे.
मुंज्या फेम आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा 21 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. विजय देवरकोंडा आगामी किंगडम सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे