पुढारी वृत्तसेवा
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो मॉडेल महिका शर्माला डेट करत आहे.
११ ऑक्टोबरला हार्दिकचा वाढदिवस आहे. त्यापूर्वी, हे दोघे मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते.
एअरपोर्टवर दिसल्यानंतर काही तासांतच हार्दिकने इन्स्टाग्राम स्टोरीवर महिकासोबतचे खास फोटो शेअर केले.
त्याच्या वाढदिवसाच्या खास गेटवेमधील या फोटोने हार्दिकच्या आयुष्यातील एका नवीन आणि आनंदी अध्यायाची सुरुवात होत असल्याचे संकेत दिले आहेत.
हार्दिकने त्याच्या मुलासोबत (अगस्त्य), आई आणि आजीसोबतचे कौटुंबिक क्षणही शेअर केले.
केक कापतानाच्या व्हिडिओमधून चाहत्यांना त्याच्या खासगी प्री-बर्थडे सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळाली.
सोशल मीडियावर आता "हार्दिक, आता लग्नाची डेट सांग!" अशा कमेंट्सची चर्चा सुरू आहे.