

मुंबई - बॉलीवूडमध्ये स्वतःच्या मेहनतीवर आपलं स्थान निर्माण करणारा अभिनेता आयुष्मान खुराना आता 2025 मध्ये आपल्या करिअरमधील पहिल्या मोठ्या दिवाळी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. त्याची आगामी चित्रपट ‘थामा’, दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्स अंतर्गत तयार होत आहे, यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
दिवाळीची रिलीज विंडो ही नेहमीच मोठ्या कलाकारांसाठी राखीव राहिली आहे, आणि त्यामुळे आयुष्मानसाठी ही वेळ करिअरमधील एक माइलस्टोन आहे. आयुष्मान म्हणतो, “दिवाळी म्हणजे एकत्र येणं, कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवणं. मी मोठा सिनेप्रेमी आहे आणि दरवर्षी दिवाळीला थिएटरमध्ये जाऊन कुटुंबासोबत सिनेमा बघणं ही माझी खास परंपरा आहे.”
तो पुढे म्हणतो, “थामा ही माझ्या करिअरमधली सर्वात मोठी रिलीज आहे आणि दिवाळीच्या सणात लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद घेऊन येणं ही खूपच जादुई भावना आहे.”
तो सांगतो की संपूर्ण टीम चित्रपटातुन प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी झटते आहे: “थामा साठी मी माझं सर्वस्व देतोय आणि माझे प्रोड्यूसर्स दिनेश विजान, अमर कौशिक, दिग्दर्शक आदित्य सर्पोतदार आणि पूर्ण टीम अक्षरशः झोकून देऊन काम करत आहे.”
थामामध्ये आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत, जी 2025 मधील सर्वात फ्रेश जोडी ठरण्याची शक्यता आहे.