Jayeshbhai Jordaar : रणवीर आलियाला घाबरला!

Complaint agaist ranveer
Complaint agaist ranveer
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

यशराज बॅनरचा जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) हा रणवीर सिंग आणि शालिनी पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 25 फेब्रुवारीला रीलीज करण्याचे नियोजन आहे. तथापि, अद्यापही चित्रपटाचा ट्रेलर समोर आलेला नाही. तसेच 25 फेब्रुवारीलाचा आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित 'गंगुबाई काठियावाडी' प्रदर्शित होत आहे, तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अजितचा 'वलीमाई'देखील याच दिवशी प्रदर्शित होत आहे. (Jayeshbhai Jordaar)

'गंगुबाई'चे प्रमोशन जोरात झाले आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकताही आहे. त्यामुळेच आलियाच्या 'गंगुबाई काठियावाडी'सोबत टक्‍कर टाळण्यासाठी रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'चे प्रदर्शन पुढे ढकलले जाऊ शकते. एका माहितीनुसार 'जयेशभाई जोरदार' 4 मार्च रोजी रीलिज होऊ शकतो. अर्थात, तेव्हाही नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'शी त्याची बॉक्स ऑफिसवर टक्‍कर होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news