Ranveer Singh: ‘डॉन 3’मधून रणवीर सिंग बाहेर का पडला; फरहान अख्तर सोबत नेमकं काय घडलं? अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

Ranveer Singh Don 3 Controversy: ‘डॉन 3’ चित्रपटातून शूटिंगच्या अवघ्या तीन आठवडे आधी रणवीर सिंहने माघार घेतल्याने फरहान अख्तर यांच्या निर्मिती संस्थेला 45 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Ranveer Singh Don 3 Controversy
Ranveer Singh Don 3 ControversyPudhari
Published on
Updated on

Ranveer Singh Don 3 Controversy: बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तर यांच्यातील वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘डॉन 3’ या बहुचर्चित चित्रपटातून रणवीर सिंगने अचानक माघार घेतल्याने केवळ निर्मात्यांचे आर्थिक नुकसान झाले नाही, तर हा वाद आता फिल्म इंडस्ट्रीतील संघटनांपर्यंत पोहोचला आहे. परिस्थिती इतकी चिघळली की फिल्म वर्कर्स संघटना FWICE ने रणवीर सिंगविरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’ म्हणजेच असहकाराची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे.

नेमका वाद कशामुळे पेटला?

मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने ‘डॉन 3’च्या शूटिंगला सुरुवात होण्याच्या अवघ्या तीन आठवडे आधी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे ‘क्रिएटिव डिफरन्सेस’ म्हणजेच सर्जनशील मतभेद असल्याचे सांगितले जात आहे.

‘डॉन 3’ हा फरहान अख्तर आणि निर्माता रितेश सिधवानी यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा मोठा प्रोजेक्ट होता. रणवीर सिंगला या फ्रँचायझीचा नवा चेहरा म्हणून मोठ्या अपेक्षेने सादर करण्यात आले होते. प्रॉडक्शन टीमच्या दाव्यानुसार, चित्रपटाच्या स्क्रिप्टपासून लोकेशन्सपर्यंत प्रत्येक निर्णय रणवीरच्या संमतीने घेतला गेला होता. परदेशात शूटिंगची तयारी झाली होती, अनेक तांत्रिक कर्मचाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स पेमेंटही करण्यात आले होते.

मात्र, शूटिंगला सुरुवात होण्याआधीच रणवीरने अचानक प्रोजेक्ट सोडल्याने निर्मात्यांना जवळपास 45 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे नुकसान केवळ पैशांचे नसून वेळ, नियोजन आणि कामाचेही असल्याचे म्हटले जात आहे.

रणवीर सिंगवर ‘बॅन’ का लावला गेला?

या प्रकरणानंतर निर्मात्यांनी हा मुद्दा फिल्म वर्कर्स संघटना फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) कडे नेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संघटनेकडून रणवीर सिंगला चर्चेसाठी तीन वेळा अधिकृत नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, त्या नोटिसांना रणवीरने प्रतिसाद दिला नाही, असा आरोप करण्यात आला.

नंतर प्रेस कॉन्फरन्सची घोषणा झाल्यानंतर रणवीरच्या मॅनेजरने ईमेलद्वारे अभिनेत्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघटनेने तो स्वीकारला नाही आणि रणवीरने स्वतः उपस्थित राहावे, अशी भूमिका घेतली.

FWICE च्या म्हणण्यानुसार, प्रश्न फक्त चित्रपट सोडण्याचा नाही, तर संवाद टाळण्याचाही आहे. संघटनेला रणवीरचं वागणं आणि स्वतःला नियमांपेक्षा वर समजल्याची भावना खटकली. त्यामुळे रणवीर बैठकीला हजर होईपर्यंत त्याच्याविरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’ नोटीस कायम राहील, असे सांगण्यात आले.

‘नॉन-कोऑपरेशन’ म्हणजे नेमकं काय?

‘नॉन-कोऑपरेशन’ म्हणजे थेट कायदेशीर बंदी नसली, तरी प्रत्यक्षात तो एक प्रकारचा अनौपचारिक बॅन मानला जातो. FWICE अंतर्गत लाखो कामगार आणि तंत्रज्ञ येतात. यामध्ये लाईटमन, स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, कॅमेरामन, सेट डिझायनर आणि इतर तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश असतो.

जर संघटनेने एखाद्या कलाकाराविरोधात असहकाराची भूमिका घेतली, तर सदस्य त्या कलाकारासोबत काम करण्यास नकार देऊ शकतात. अशा परिस्थितीत चित्रपटाचे शूटिंग थांबण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अभिनेत्यासाठी हा गंभीर मुद्दा मानला जातो.

रणवीर सिंगने ‘डॉन 3’ का सोडला?

रणवीर सिंगने याबाबत थेट सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये वारंवार बदल होत होते. 2024 मध्ये रणवीरला ‘डॉन 3’चा चेहरा घोषित करण्यात आल्यानंतर चित्रपटाच्या कथानकात अनेक बदल झाले.

दरम्यान, डिसेंबर 2025 मध्ये रणवीरचा ‘धुरंधर’ चित्रपट सुपरहिट ठरला. या यशानंतर त्याची मार्केट व्हॅल्यू आणि स्टारडम मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बोलले जाते. त्यानंतर ‘डॉन 3’ची अंतिम स्क्रिप्ट आणि दिग्दर्शनाचा दृष्टिकोन रणवीरला पूर्णपणे पटला नाही. त्याने काही बदल सुचवले, पण ते मान्य झाले नाहीत आणि अखेर त्याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

Ranveer Singh Don 3 Controversy
Adinath Kothare system movie | 'आपण मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी पूर्ण होतात., माझंही स्वप्न पूर्ण..', आदिनाथ कोठारेने शेअर केला अनुभव

रणवीर सिंगने अखेर मौन सोडले; काय म्हणाला अभिनेता?

वाद वाढल्यानंतर रणवीर सिंगच्या अधिकृत प्रवक्त्याने निवेदन जारी करत अभिनेत्याची भूमिका स्पष्ट केली. निवेदनात म्हटले आहे की, रणवीरला संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीबद्दल आणि ‘डॉन’ फ्रँचायझीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीबद्दल खूप आदर आहे.

‘डॉन 3’ संदर्भात अलीकडे सुरू असलेल्या चर्चांदरम्यान रणवीरने जाणीवपूर्वक शांतता राखली. कारण, व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे सन्मान आणि परस्पर आदराने हाताळले जावेत, असे त्याचे मत आहे.

तसेच, अनेक प्रकारच्या चर्चा आणि अंदाज समोर येत असले तरी सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देऊन वाद वाढवण्याची गरज रणवीरला वाटली नाही. सध्या त्याचे पूर्ण लक्ष कामावर आणि आगामी प्रोजेक्ट्सवर असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

रणवीरने डॉन फ्रँचायझीशी संबंधित शुभेच्छाही दिल्या असून, कठीण प्रसंगी संयम राखणे हा नेहमीच त्याचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचे सांगण्यात आले आहे.

Ranveer Singh Don 3 Controversy
Amitabh Bachchan Sunday Darshan | अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बाहेर चाहत्याची प्रकृती बिघडली; 'संडे दर्शन' दरम्यान गोंधळ

या वादाचा रणवीरच्या करिअरवर काय परिणाम होऊ शकतो?

रणवीर सिंग सध्या बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सपैकी एक मानला जातो. ‘धुरंधर’च्या यशानंतर अनेक मोठे स्टुडिओ त्याच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत. मात्र, जर फिल्म वर्कर्स संघटनांशी तणाव वाढला, तर भविष्यातील प्रोजेक्ट्स अडचणीत येऊ शकतात.

कारण, कोणत्याही चित्रपटासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांशिवाय शूटिंग शक्य नसते. त्यामुळे हा वाद लवकर मिटवण्यासाठी रणवीर सिंगने स्वतः पुढे येऊन संवाद साधण्याची गरज असल्याचे इंडस्ट्रीत बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news