रणदीप हुड्डाने दाखवला मुलीचा चेहरा, नाव केलं जाहीर, अर्थ आहे खास

अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नवजात बाळाची झलकही दाखवली आहे.
रणदीप हुड्डाने दाखवला मुलीचा चेहरा, नाव केलं जाहीर, अर्थ आहे खास
रणदीप हुड्डाने दाखवला मुलीचा चेहरा, नाव केलं जाहीर, अर्थ आहे खासfile photo
Published on
Updated on

randeep hooda lin laishram blessed baby girl nyomica share first photo

पुढारी ऑनलाईन :

बॉलिवूडचा दमदार अभिनेता रणदीप हुड्डा वडील झाला आहे. त्यांची पत्नी लिन लैशराम यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नवजात बाळाची झलकही दाखवली आहे.

रणदीप हुड्डाने दाखवला मुलीचा चेहरा, नाव केलं जाहीर, अर्थ आहे खास
Magical Drink Craze : मलायका असो वा दीपिका सकाळी उठल्यावर घेतात 'हे' खास ड्रिंक

रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांच्या आयुष्यात आनंदाने प्रवेश केला आहे. लग्नानंतरच्या सुंदर प्रवासानंतर आता हे जोडपे आई-वडील झाले आहे. लिनने एका गोंडस परीला जन्म दिल्याने हुड्डा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

रणदीपने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि आपल्या लाडक्या मुलीची पहिली झलक दाखवली. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रणदीप हुड्डाने दाखवला मुलीचा चेहरा, नाव केलं जाहीर, अर्थ आहे खास
Bharti Singh little boy Kaju|भारती सिंहने दाखवला ‘काजू’चा पहिला चेहरा; ‘गोले’च्या भावाचा क्यूटनेस ओव्हरलोड

रणदीपने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिन लैशराम आपल्या मुलीला प्रेमाने आणि शांतपणे कुशीत घेतलेली दिसते. रणदीपने आपल्या मुलीला “माझ्या जगाचा नवा केंद्रबिंदू” असे म्हटले आहे.

मुलीचं नाव जाहीर

रणदीप हुड्डाने या भावनिक क्षणाची झलक इंस्टाग्रामवर शेअर करत आपल्या आनंदाची अभिव्यक्ती केली. त्यांनी आपल्या मुलीचं नावही जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या लेकीचं नाव ‘न्योमिका हुड्डा’ (Nyomika Hooda) असं ठेवलं आहे. या नावाचा अर्थ आहे – ‘देवाची कृपा, स्वातंत्र्य आणि आकाशासारखी अमर्यादता’.

नावाबद्दल कपलची भावना

रणदीप आणि लिन यांनी सांगितले की, “आमच्या मुलीचं नाव ठेवणं हा आमच्यासाठी अत्यंत खास आणि भावनिक क्षण होता. ‘न्योमिका’ हे नाव ऐकताच आम्हाला वाटलं की हेच नाव योग्य आहे. मागचा एक महिना आमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला असून, पालक म्हणून आम्ही या नव्या प्रवासातील प्रत्येक क्षण अनुभवत आहोत.”

2023 मध्ये केला विवाह

रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांनी 2023 साली लग्न केलं होतं. त्यांनी मणिपूरमधील इम्फाळ येथे पारंपरिक मैतेई पद्धतीने विवाह केला होता. त्यांच्या लग्नाचीही त्या वेळी खूप चर्चा झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news