Magical Drink Craze : मलायका असो वा दीपिका सकाळी उठल्यावर घेतात 'हे' खास ड्रिंक

अभिनेत्रींच्या सुंदरतेचे रहस्य आले समोर, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर घेतात हे मॅजिकल ड्रिंक.
Magical Drink Craze
Magical Drink Craze : मलायका असो वा दीपिका सकाळी उठल्यावर घेतात 'हे' खास ड्रिंकfile photo
Published on
Updated on

actresses morning secret drinks for glowing skin gut improvement anti ageing

पुढारी ऑनलाईन :

बॉलीवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री, अभिनेत्री आपली सुंदरता आणि फिट बॉडी टिकवण्यासाठी खूप मेहनत घेतात. मग ती व्यायाम असो किंवा आहार. Deepika Padukone, Katrina Kaif, Malaika Arora पासून Ankita Lokhande पर्यंत अनेक अभिनेत्री सकाळी उपाशीपोटी एक खास ड्रिंक घेतात. काय आहेत हे सीक्रेट ड्रिंक्स, चला जाणून घेऊया.

Magical Drink Craze
Happy Birthday Abhishek Bachchan | स्मार्ट इन्व्हेस्टर अभिषेक बच्चन: कोट्यवधींची संपत्ती उभी करण्यामागचं गुपित काय?

दीपिका पदुकोण

दीपिका आपले केस दाट आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठी पुदीना, हळद, कडुनिंबाची पाने, कढीपत्ता आणि बीट यांचा ज्यूस बनवून पिते.

कतरिना कैफ

कटरीना सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिते. त्यात कधी लिंबाचा रस तर कधी आल्याचा रस मिसळते. हे पाणी पिल्यानंतरच ती व्यायाम करते.

Magical Drink Craze
सलमान खानचे ६० व्या वर्षात पदार्पण, यश, संपत्ती सगळं मिळालं… पण 'एक' इच्छा अजूनही अपूर्ण

मलायका अरोरा

फिटनेस क्वीन मलायका अरोरा वयाच्या ५० व्या वर्षीही २५ शीतल्या तरूणीसारखी दिसते. ती सकाळी उपाशीपोटी जिरे, ओवा आणि बडीशेप यांचे पाणी पिते. हे मसाले भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले जातात आणि सकाळी थोडे गरम करून त्यात लिंबू घालून पिते.

शिल्पा शेट्टी

फिटनेस एक्सपर्ट शिल्पा शेट्टी तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. ती दिवसाची सुरुवात तूप, हळद आणि काळी मिरी मिसळलेल्या पाण्याने करते.

अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे सकाळी उठल्यावर दीड ते दोन लिटर विविध प्रकारचे पाणी पिते. ती आधी मेथीदाण्याचे पाणी पिते. त्यानंतर जिरे-ओवा-बडीशेप पावडरचे पाणी घेते. त्यासोबत ती एलोवेरा आणि एक लसूण ठेचून खाते. नंतर केशराचे पाणी पिते.

अंकिता आणखी एक खास एनर्जी ड्रिंकही बनवते, जे तिचे पतीही पितात. नारळपाणी, बीट, गाजर, डाळिंब, आवळा, कच्ची हळद आणि गोंद कतीरा मिसळून हे ड्रिंक तयार केले जाते, जे दिवसभर ऊर्जा देते.

सोहा अली खान

सोहा अली खान पूर्वी सकाळी कॉफी पित असे, पण आता तिने तिची सवय बदलली आहे. आता ती कोमट पाण्यात हळद, आले, चिया बिया आणि पिंक सॉल्ट मिसळून पिते. यामुळे तिच्या पचनसंस्थेला फायदा झाला आहे.

कीर्ती सुरेश

दक्षिणेतील अभिनेत्री कीर्ती सुरेश सकाळी ग्रीन ज्यूस पिते. ती ब्लांच केलेली पालकाची पाने, सेलरी, लिंबू, काकडी, पुदीना, आले आणि लसूण एकत्र ब्लेंड करून हा ज्यूस तयार करते.

आलिया भट्ट

आलिया भट्ट पूर्वी खूप कॉफी पित होती, पण आता तिने ती सवय सोडली आहे. आता ती सकाळी कोमट पाण्यात लिंबू घालून पिते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news