Ranbir Kapoor Ramayana Look: ‘रामायण’ मधील रणबीर कपूरचा लूक चर्चेत; सोशल मीडियावर जोरदार टीका, का होतोय वाद?

Ranbir Kapoor Ramayana Look: नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा कथित लीक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भगवान रामाच्या भूमिकेतील त्यांच्या विग आणि लूकवर नेटिझन्सनी टीका करत आहेत.
Ranbir Kapoor Ramayana Look
Ranbir Kapoor Ramayana LookPudhari
Published on
Updated on

Ranbir Kapoor Ramayana Look Leaked Controversy Reaction: बॉलिवूडमधील यंदाच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘रामायण’ या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर सध्या जोरदार वाद होत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल आणि रवी दुबे यांसारखी मोठी स्टारकास्ट आहे. मात्र अलीकडे रणबीर कपूरचा भगवान रामाच्या भूमिकेतील लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

लीक फोटोमुळे वादाला सुरुवात

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या अवतारात दिसत आहे. त्याने केशरी धोतर आणि जानवे परिधान केलेले आहे. मात्र त्याचा पूर्ण चेहरा स्पष्ट दिसत नाही. कपड्यांपेक्षा त्याच्या डोक्यावरचा विग अधिक चर्चेचा विषय ठरत आहे.

अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हा विग कृत्रिम वाटत असल्याचे म्हटले आहे. इतक्या मोठ्या बजेटच्या चित्रपटात लूककडे अधिक बारकाईने लक्ष द्यायला हवे होते, अशी टीका काहींनी केली.

‘आदिपुरुष’ची आठवण

काही नेटिझन्सनी या लूकची तुलना आदिपुरुष या चित्रपटाशी केली. ‘बनावट केस आणि दाढी’च्या बाबतीत बॉलिवूडने आधीच्या चुका अजूनही सुधारलेल्या नाहीत, अशी टीका सोशल मीडियावर होत आहे.

Ranbir Kapoor Ramayana Look
Ranbir Kapoor Ramayana LookPudhari

निर्माते नमित मल्होत्रा यांनी चित्रपटाच्या भव्यतेबाबत केलेल्या दाव्यांवरही काहींनी टीका केली आहे. तर काहींनी “महेश बाबू रामाच्या भूमिकेसाठी अधिक योग्य ठरला असता,” असेही मत व्यक्त केले. एका युजरने तर “तो भगवान रामापेक्षा शकुनी मामांसारखा दिसत आहे,” अशी टीका केली आहे.

Ranbir Kapoor Ramayana Look
Nawazuddin Siddiqui confirm Tumbbad 2 |'तुंबाड'च्या लोककथेत नवाजुद्दीनची खास भूमिका, सोहम शाहने पोस्ट केली शेअर

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

‘रामायण’ हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा भव्य चित्रपट आहे. हा चित्रपट प्राइम फोकस स्टुडिओज आणि ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG यांच्या सहकार्याने तयार होत आहे. तसेच अभिनेता यशच्या ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स’चीही साथ आहे.

Ranbir Kapoor Ramayana Look
Toxic Tabaahi Song : यश-कियाराच्या चित्रपटाचे पहिले गाणे 'तबाही' रिलीज, पण चाहते का झालेत नाराज?

पहिला भाग दिवाळीमध्ये तर दुसरा भाग पुढच्या दिवाळीमध्ये आयमॅक्स फॉरमॅटमध्ये प्रदर्शित करण्याचा प्लॅन आहे. प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

सध्या लीक झालेल्या फोटोमुळे निर्माण झालेला वाद हा अधिकृत टीझर किंवा ट्रेलर येईपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांनी याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news