Ramayana Box Office Collection Day 1: २०२६ चा सर्वात मोठा ओपनिंग ठरला 'रामायण', पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

Ramayana Box Office Collection Day 1: २०२६ चा सर्वात मोठा ओपनिंग ठरला 'रामायण', पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई
Ramayana Box Office Collection
Ramayana Box Office CollectionPudhari photo
Published on: 
Updated on: 

Ramyaan day 1 collection

नितीश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. तिकिट बारीवर दुपारपर्यंत गती पकडलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी शेवटपर्यंत कमाईची गती कायम ठेवली. रामायणने पहिल्याच दिवशी ५० कोटी पार झाले असून २०२६ मधील हा दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, रवि दुबे यांचा रामायण ५ नोव्हेंबर रोजी रिलीज होताच या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र रिव्ह्यू मिळाला. काही प्रेक्षकांनी साई पल्लवीच्या अभिनयाचे तर काहींनी यशचे कौतुक केले आहे.

रामायण बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिला दिवस -

मीडिया रिपोर्टनुसार, भारतात ६४.८५ कोटी रुपयांची कमाई भारतात झाली आहे. एकूण २५ हजार २०० शोज होते. तर ग्रॉस कलेक्शन ७७.५० कोटी रुपये कमाई झाली.

हिंदी- ४७.५० कोटी

कन्नड- ७.२५ कोटी

तेलुगू- ६ कोटी

तमिळ- २.६० कोटी

मल्याळम- १.५० कोटी

पहिल्याच दिवशी एकूण २,५२५,७७५ कोटी तिकिटांची विक्री झाली. त्याआधी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली होती. आता पहिल्या दिवशीचे कलेक्शन पाहता हा चित्रपट छप्परफाड कमाई करेल.

प्रतीक्षा सनी देओलची

चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये जंगलात अनेक प्राणी पळताना दिसताहेत. त्यात पवनपुत्र हनुमान यांची झलक देखील दिसते. पण यात सनी देओलचा चेहरा दिसत नाही. बॅकग्राऊंडमध्ये ‘जय श्री राम' जयघोष ऐकू येतो. त्यामुळे प्रेक्षक वर्ग चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. सनी देओल भगवान हनुमान अवतारात दिसणार आहे.

Ramayana Box Office Collection
Ramayana First Review: रणबीर कपूरचा राम अवतार, यशचा दमदार अंदाज अन् भव्य अॅक्शन; कसा आहे 'रामायण' चित्रपट?

या बड्या गायकांनी मिळून गायकांनी मि‍ळून गायलं हनुमान चालीसा

सनी देओलची एन्ट्री खास करण्यासाठी निर्मात्यांनी सुंदर संगीत दिलं आहे. या सीनमध्ये हनुमान चालीसा ५ मोठ्या गायकांनी मिळून गायलं आहे. शंकर महादेवन, कैलाश खेर, सुखविंदर सिंह, दिलजीत दोसांझ, मोहित चौहान यांनी हनुमान चालीसा साठी आपला जादुई स्वर दिला आहे.

Ramayana Box Office Collection
Ramayana BO Collection: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी १० चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले; किती कोटी कमावले?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.