

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र काम करणार आहेत. अयान मुखर्जीच्या रोमँटिक-ड्रामा चित्रपटातून दोघांची वापसी होणार आहे. 'ये जवानी है दिवानी'नंतर चाहत्यांना पुन्हा या सुपरहिट जोडीचा जादू पाहायला मिळणार आहे.
Ranbir to make directorial debut with Deepika Padukone
मुंबई- एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा एकत्र येत आहे. बराच काळ दोघांमधील अबोला आणि अंतराबद्दल चर्चा सुरू होती. मात्र आता त्या सगळ्या अफवांना पूर्णविराम देत, दोघे अयान मुखर्जीच्या आगामी चित्रपटातून पुन्हा पडद्यावर झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांमध्ये रणबीर-दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केली होती. दोघांचे ऑनस्क्रीन नाते तेव्हाच सुपरहिट ठरले होते. आता काही वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा या जोडीचा जादू पाहायला मिळणार आहे.
अयान मुखर्जीच्या चित्रपटातून रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघे अयान मुखर्जीच्या पुढील चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट आरके फिल्म्स बनवणार असल्याची माहिती समोर आलीय.
चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी हे रणबीरचे जवळचे मित्र आहेत. ‘ब्रह्मास्त्र’नंतर हा त्यांचा पुढील मोठा प्रोजेक्ट असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट एक रोमँटिक-ड्रामा असेल ज्यात आधुनिक नात्यांचे वास्तव दाखवले जाणार आहे. दीपिकाने या स्क्रिप्टला ग्रीन सिग्नल दिल्याचं सांगितलं जातं.
रिपोर्टनुसार, अभिनेता रणबीर कपूर त्याचे दिवंगत आजोबा राज कपूर यांनी १९४८ मध्ये स्थापन केलेल्या आरके स्टुडिओज अंतर्गत पुन्हा चित्रपट आणणार आहेत. या रिलॉन्चचा एक भाग म्हणून, रणबीर दीपिका पदुकोणसोबत सहकार्य असलेल्या प्रोजेक्टसह दिग्दर्शनात पदार्पण करेल. आरके स्टुडिओजने 'आवारा' (१९५१), 'मेरा नाम जोकर' (१९७०) आणि 'बॉबी' (१९७३) सारखे प्रतिष्ठित चित्रपट तयार केले होते, तर त्यांचा शेवटचा चित्रपट 'आ अब लौट चलें' होता.
अयान मुखर्जी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा या चित्रपटाच्या कहाणीवर काम करत आहेत. आरके फिल्म्स दीर्घकाळ बंद होते. आता पुन्हा डिसेंबर २०२५ पासून सुरू करण्याची तयारी आहे आणि या सोबतच रणबीर-दीपिकाचा हा नवा चित्रपट लॉन्च केला जाऊ शकतो.
मॉडर्न लव्ह स्टोरी की फॅमिली ड्रामा?
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची एक मॉडर्न लव्ह स्टोरी किंवा फॅमिली ड्रामा असेल, त्याची कहाणी अमेरिकत सेट आहे. एका विवाहित कपलची कहाणी जी नाती, जबाबदाऱ्या आणि स्वत:ची ओळख बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटाचे शूटिंग २०२६ च्या दिवाळीपर्यंत सुरू होऊ शकते. सध्या रणबीर कपूर रामायण आणि ब्रह्मास्त्र २ च्या तयारीत आहे.तर दीपिका पादुकोण किंग आणि आपल्या अन्य प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.