पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या ब्रह्मास्त्रने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींची कमाई ( Brahmastra Collection ) केली आहे. यामुळे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक याच्यांसोबत सर्व टिमचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. तरण आदर्शसारख्या समीक्षकांनी 'हा चित्रपट निराश करणारा आहे' असं मत नोंदवलं गेलं होतं. असं असतानाही या चित्रपटाने ३०० कोटींचा गल्ला जमवणं हे या चित्रपटाच्या सगळ्या टीमसाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. करण जोहरने या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करणारी पोस्ट 'कू' या सोशल मीडिया अॅपवर शेअर केली आहे.
ब्रह्मास्त्र रिलीज होण्यापूर्वी आलेल्या काही बिग बजेट चित्रपटांना बहिष्काराच्या मोहिमेमुळे मोठा फटका बसला होता. बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट याच मोहिमेमुळे पडला असल्याचे सांगितले जातं होतं. मात्र, यावर चित्रपट समीक्षकांची वेगवेगळी मते होती. काहींनी या चित्रपटातील कथानक कमकुवत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आगामी 'ब्रह्मास्त्र' चं काय होतं याकडे बॉलिवूडचं लक्ष लागलं होतं. परंतु, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करत तब्बल ३६ कोटींची कमाई केली. यामुळे याही पेक्षा येत्या काळात कमाईचा आकडा वाढेल अशी सर्व टिमचे इच्छा असल्याचेही करण जोहरने सांगितले.
या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. ( Brahmastra Collection )
हेही वाचलंत का?