Ramayana Box Office Collection Day 21: ‘पुष्पा 2’चा विक्रम मोडला! ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; जगभरात किती कोटी कमावले?

Ramayana Box Office Collection Day 21: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या 21 दिवसांत जगभरात 1,755.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Ramayana Box Office Collection
Ramayana Box Office Collection Pudhari
Published on: 
Updated on: 

Ramayana Box Office Collection Day 21: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले असले, तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटाने जगभरातील कमाईच्या बाबतीत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला मागे टाकले आहे. 21 दिवसांत ‘रामायण’ने जगभरात तब्बल 1,755.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे लक्ष 1,000 कोटी रुपयांच्या भारतातील नेट कमाईच्या टप्प्याकडे लागले आहे.

‘रामायण’ची 21 व्या दिवसाची बॉक्स ऑफिस कमाई किती?

‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने प्रदर्शनाच्या 21 व्या दिवशी भारतात 9.60 कोटी रुपयांची नेट कमाई केली. या दिवशी देशभरात चित्रपटाचे 15,700 शो दाखवण्यात आले.

या कमाईसह चित्रपटाचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 1,173.60 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर नेट कलेक्शनचा आकडा 982.55 कोटी रुपये झाला आहे. म्हणजेच भारतात 1,000 कोटी रुपयांची नेट कमाई करण्यासाठी चित्रपटाला आता 17.45 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

भाषेनुसार कमाईचा विचार केला, तर हिंदी आवृत्तीचा सर्वाधिक वाटा आहे. 21 व्या दिवशी हिंदी आवृत्तीने 6.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर मल्याळम आवृत्तीने 1.10 कोटी रुपये, कन्नडने 75 लाख रुपये, तमिळने 70 लाख रुपये आणि तेलुगू आवृत्तीने 30 लाख रुपयांची कमाई केली.

Ramayana Box Office Collection
Netflix Controversy: पाकिस्तानी सीरिज दाखवणं नेटफ्लिक्सला पडणार महागात! AICWAचा थेट इशारा; कार्यालयाला घेराव घालणार, कारण काय?

जगभरात 1,755 कोटींची कमाई; ‘पुष्पा 2’ला टाकले मागे

‘रामायण’ने भारताबरोबरच परदेशातही चांगली कमाई केली आहे. 21 व्या दिवशी परदेशातील चित्रपटगृहांमधून या चित्रपटाने 6 कोटी रुपये कमावले. त्यामुळे चित्रपटाचे एकूण परदेशातील ग्रॉस कलेक्शन 582 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

भारतातील 1,173.60 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई आणि परदेशातील 582 कोटी रुपयांची कमाई मिळून चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन 1,755.60 कोटी रुपये झाले आहे.

या कमाईसह ‘रामायण’ने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’चा विक्रम मोडला आहे. ‘पुष्पा 2’चे जगभरातील लाइफटाइम कलेक्शन 1,742.10 कोटी रुपये होते. त्यामुळे आता ‘रामायण’ने हा आकडा ओलांडत जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे.

Ramayana Box Office Collection
Shraddha Kapoor Video: कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूरच्या डोळ्यांत पाणी! म्हणाली, 'मी तुम्हाला एक सांगू...', नेमकं काय घडलं?

आता ‘बाहुबली 2’ आणि ‘दंगल’चे विक्रम मोडणार?

‘पुष्पा 2’ला मागे टाकल्यानंतर आता ‘रामायण’समोर आणखी मोठी आव्हाने आहेत. जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत वरचे स्थान मिळवण्यासाठी चित्रपटाला ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’, ‘धुरंधर: द रिव्हेंज’ आणि ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांचे कमाईचे आकडे मागे टाकावे लागणार आहेत.

सध्या चित्रपटाने जगभरात 1,750 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चौथ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई सुरू राहिल्यास त्याच्या एकूण कलेक्शनमध्ये आणखी वाढ होऊ शकते.

दरम्यान, भारतातील 1,000 कोटी रुपयांच्या नेट कमाईचा टप्पा गाठणे हे चित्रपटाचे पुढचे मोठे लक्ष्य आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कमाईचा वेग काहीसा मंदावला असला, तरी आगामी वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

तीन आठवड्यांच्या यशस्वी प्रवासानंतर ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवून दिली आहे. आता चौथ्या आठवड्यात हा चित्रपट किती कमाई करतो आणि आणखी कोणते विक्रम मोडतो, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.