Rakul Preet Income Tax Raid: गॉडफादर नाही; मी 'आर्मी'च्या बॅकग्राऊंडमधून आली आहे... रकुल प्रीत IT च्या धाडीवरून जाम भडकली

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीतवर प्राप्तीकर विभागाची छापेमारी झाल्याचे वृत्त आले होते. मात्र याबाबत रकुल प्रीतने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे.
Rakul Preet Income Tax Raid
Rakul Preet Income Tax Raidpudhari
Published on: 
Updated on: 

Rakul Preet ED Controversy: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीतवर प्राप्तीकर विभागाची छापेमारी झाल्याचे वृत्त आले होते. मात्र याबाबत रकुल प्रीतने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे. तिने तिच्यावर प्राप्तीकर विभागाची कोणतीही धाड पडलेली नाही किंवा तिच्या बाबत बेनामी संपत्तीची कोणती शोधमोहीम सुरू नाहीये असा खुलासा केला. यावेळी तिने काही माध्यम कर्मींना देखील फटकाले.

Rakul Preet Income Tax Raid
Rakul Preet Singh | 'आज ब्ल्यू है पानी पानी' रकुलचा मस्तीभरा मालदीव व्हेकेशन, पूलमध्ये धम्माल मूड

मी आर्मी बॅकग्राऊंडमधून येते

रकुल प्रीत आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, 'काही स्वयंम घोषित ऑनलाईन रिपोर्टर आणि काही मुध्य माध्यमांमधील पत्रकारांकडून एखाद्या बातमीची शहानिशा न करता ती सेन्सेशनल पद्धतीनं देण्याचा एक नवा ट्रेंडच सुरू झाला आहे. अशांसाठी एकदाच सर्व माहिती स्पष्टपणे देते.

प्राप्तीकर विभागाची जी शोधमोहिम माझ्याबाबत सुरू आहे असं भासवलं गेलं ती माझ्या बाबतीत नाहीये. मी आर्मीच्या बॅकग्राऊंडमधून येते. या इंडस्ट्रीत माझा कोणीही गॉडफादर नाहीये. मी निव्वळ माझ्या हार्ड वर्कमुळे इथं आहे. मी कायदा पाळणारी नागरिक असून मी गेल्या २० वर्षांपासून माझे सर्व टॅक्स भरते.

Rakul Preet Income Tax Raid
Mumbai Income Tax Raids: बॉलीवूडमध्ये आयकर छापे; पॅनोरमा, कुमार मंगत पाठक, वासू भगनानी, रकुलप्रीत यांच्या कार्यालयांची झडती

मला कोणीही काही गिफ्ट दिलेले नाही

रकुल प्रीत आपल्या पोस्टमध्ये प्रॉपर्टी गिफ्ट बाबत देखील खुलासा केला आहे. ती म्हणते, 'मी कोणत्याही बेकायदेशीर हवाला रॅकटमध्ये वैयक्तिकरित्या किंवा कोणत्याही प्रोडक्शन हाऊसच्या मार्फत सामील नाहीये. मी इथं अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की माझ्याकडे कोणतीही बेनामी प्रॉपर्टी नाहीये, कोणाच्या वतीने किंवा कोणत्याही देशात किंवा मायदेशात माझी अशी संपत्ती नाहीये. कोणीही आणि कधीही मला अशी प्रोपर्टी गिफ्ट केलेली नाही. तत्व म्हणून मी देखील अशा प्रकारचे गिफ्ट कधी स्विकारलेले नाहीयेत.'

रकुल प्रीतने पोस्टमध्ये व्यावसायिक दबावासाठी कोणाच्या प्रतिष्ठेवर आणि चरितार्थावर बालट आणून नये अशी देखील विनंती केली आहे. 'मी ज्या कुणी हे चुकीचे वृत्त छापले त्यांना विनंती करत की ते वृत्त तुम्ही काढून टाका आणि फॅक्ट्स स्पष्ट करा. जे कोणी मीडिया बिजनेस चालवत आहेत त्यांना त्यांचे व्यावसायिक दबाव किती आहे याची मला जाणीव आहे. मात्र यामुळं तुम्ही तथ्यांचा बळी देऊ शकत नाही. तसेच कोणाच्या प्रतिष्ठा आणि चरितार्थावर तर नक्कीच बालट येऊ नये.'

Rakul Preet Income Tax Raid
Rakul Preet Singh Marriage : लग्नासाठी रकुल प्रीत सिंग -जॅकी भगनानी गोव्यात दाखल (Video)

रकुल प्रीतने जॅकी भगनानीशी लग्न केलं आहे. जॅकीचे वडील आणि प्रसिद्ध प्रोड्युसर वासू भगनानी हे सध्या प्राप्तीकर विभाग, ईडीच्या रडारवर असून त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news