

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. प्राजक्ताने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असे कॅप्शन देत तिने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने ब्रोकेड कांजीवरम स्टाईल साडी नेसली आहे. याशिवाय त्याला साजेसे दागिने हि घातले आहे. याशिवाय गळ्यात सुंदर हार घातला आहे.
यापूर्वीही एका पोस्टमधून तिने लग्नासंबंधीच्या चर्चांची हिंट दिली होती. यामध्ये तिने काही फोटो शेअर केले होते. पाहुणे मंडळी ९६ कुळी मराठा असे हॅशटॅग तिने यावेळी शेअर केलेल्या पोस्टमधून दिले होते. त्यावेळी अनेकांनी प्राजक्ताचा कांदेपोह्यांचा कार्य्रक्रम असल्याची शंकाहि व्यक्त केली होती तर काहींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावहि केला होता. प्राजक्ताने मात्र्यावर कोणतेही मत व्यक्त केले नव्हते.
प्राजक्ताने साखरपुड्याचे फोटो शेअर केले असले तरी त्यामध्ये भावी पतीची झलक किंवा उल्लेख अजिबात केलेला नाहीये. त्यामुळे तिचा भावी जोडीदार कोण आहे याबाबत मात्र काही समोर आलेले नाही.
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाईंची व्यक्तिरेखा साकारली होती . यातील तिच्या भूमिकेचे अत्यंत कौतुकही झाले होते. यानंतर तिच्याकडे अनेक ऑफर्स आल्याचेही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
यानंतर प्राजक्ता आई माझी काळूबाई या मालिकेत दिसली होती. अलका कुबल या मालिकेत काळूबाईच्या भूमिकेत होत्या. मालिका उत्तम ट्रॅकवर सुरु असतानाच प्रॉडक्शन आणि प्राजक्तामध्ये वाद समोर आले. यावेळी प्रोडक्शनने प्राजक्तावर सेटवर वेळेवर न येण्याचे आणि गैरहजर राहण्याचे आरोप केले होते तर प्राजक्ताने सेटवर सहकार्य केले जात नसल्याचा आरोप केला जात होता . मालिकेच्या निर्मात्या असलेल्या अलका कुबल यांनीही या आपले मत नोंदवले होते.