

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री श्रुती हासन, दक्षिण भारतीय चित्रपट स्टार थलैवा रजनीकांत यांच्या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे नाव कुली असून दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. कुलीमध्ये रजनीकांत यांची मुख्य भूमिका आहे. कुली चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर जारी केले आहे.
निर्मात्यांकडून जारी केलेले मोनोक्रोमॅटिक पोस्टरमध्ये श्रुती हासन प्रीतीची भूमिका साकारेल.
पोस्टरमध्ये श्रुती हासन हातात एक फावडा घेतलेला दिसत आहे. निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कुलीच्या जगातील श्रुती हासनला प्रीती रूपात सादर केले जात आहे. चित्रपट ‘कुली’ची निर्मिती सन पिक्चर्सद्वारा करण्यात आला आहे. अनिरुद्ध रविचंदर संगीत दिग्दर्शक आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज करणार असल्याचे वृत्त समजते.