

Shahrukh khan and Rajanikant Shared screen together
शाहरुख खानचे रजनीकांत प्रेम सर्वश्रुत आहे. रा वनमधील कॅमिओ असो किंवा चेन्नई एक्सप्रेसमध्ये लुंगी डान्सच्या माध्यमातून लाडक्या थलाईवाला दिलेला ट्रिब्यूट असो शाहरुखने रजनीकांतवरील प्रेम जाहीर करताना कोणतीही कसर ठेवली नाही. या जोडीबाबत सध्या एक अपडेट समोर येते आहे. शाहरुख रजनीकांतच्या आगामी जेलर 2 मध्ये दिसणार असल्याची चर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जोर धरते आहे.
बॉक्स ऑफिस ऑफ साऊथ इंडियाच्या x अकाऊंटवर एक रिपोर्ट शेयर केला आहे. यामध्ये शाहरुख या सिनेमाचा हिस्सा नसल्याचे समोर येत आहे. त्याच्या या सिनेमातील सहभागाबद्दल मेकर्सनीही काही उल्लेख केला नाही. केवळ सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांमध्ये या सहभागाचा उल्लेख होतो आहे.
रजनीच्या जेलर सिनेमाचा सिक्वेल जेलर 2चे शूटिंग केरळमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे यात मल्याळी अभिनेता फहाद फासील देखील दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
जेलरने रिलीजनंतर 600 कोटींहून बिझनेस केला होता. या सिनेमात रजनीकांतने रिटायर्ड जेलरचा रोल केला होता. या सिनेमात त्याचा मुलगा आश्चर्यरित्या गायब होतो. यानंतर मुलाच्या सुरक्षेसाठी रजनी त्या प्रत्येकाशी कशाप्रकारे बदला घेतो हे या सिनेमात आहे. 74 वर्षीय रजनीची या ही सिनेमात दमदार अॅक्शन दिसून येणार आहे.
तर दुसरीकडे शाहरुख लेकीच्या सिनेमात कॅमिओ करण्यासाठी सज्ज झाला आहे. यात सुहानासोबत दीपिकाही दिसणार आहे. तर पठाण 2 मधूनही तो मोठ्या पडद्यासाठी सज्ज होणार असल्याची चर्चा आहे.